TATA Technologies and BMW  sakal
Personal Finance

TATA Technologies and BMW : ‘टाटा टेक्नॉलॉजीज’चा ‘बीएमडब्ल्यू’शी करार

उत्पादन क्षेत्राला अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा देणारी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी आणि वाहनक्षेत्रातील ‘बीएमडब्ल्यू’ समूह संयुक्तपणे पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई, भारतात ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि आयटी विकास केंद्र स्थापन करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्पादन क्षेत्राला अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा देणारी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी आणि वाहनक्षेत्रातील ‘बीएमडब्ल्यू’ समूह संयुक्तपणे पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई, भारतात ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि आयटी विकास केंद्र स्थापन करणार आहेत. या दोन्ही कंपन्यांनी याबाबत संयुक्त उपक्रम करार केला आहे. बंगळूर आणि पुणे येथे ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर विकास केंद्रांची स्थापना केली जाईल, तर चेन्नईमध्ये सॉफ्टवेअर व आयटी विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे टाटा टेक्नॉलॉजीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

या संयुक्त उपक्रमाअंतर्गत ‘जगासाठी भारतात अभियांत्रिकी’ या तत्त्वाचे प्रतिनिधित्व करत, टाटा टेक्नॉलॉजीजच्या डिजिटल अभियांत्रिकी कौशल्याचा लाभ घेऊन‘बीएमडब्ल्यू’ समूहाच्या जागतिक आयटी केंद्रामध्ये सॉफ्टवेअर कोडिंग क्षमतांच्या विस्तारावर भर देण्यात येईल. सॉफ्टवेअर परिभाषित वाहनांसाठी सॉफ्टवेअर विकासावर; तसेच स्वयंचलित ड्रायव्हिंग आणि डिजिटल सेवांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

या संयुक्त प्रकल्पात सुरुवातीला १०० अनुभवी, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, आगामी वर्षांमध्ये ही संख्या चार अंकी संख्येपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. हा संयुक्त उपक्रम ‘बीएमडब्ल्यू’च्या सॉफ्टवेअर आणि आयटी हबच्या जागतिक नेटवर्कचा भाग बनेल, असेही कंपनीने म्हटले आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजीज’चे सीईओ आणि एमडी वॉरेन हॅरिस म्हणाले, ‘‘बीएमडब्ल्यू समूहासोबतचे आमचे सहकार्य जगभरातील ग्राहकांना ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि डिजिटल अभियांत्रिकीमधील उच्च-स्तरीय उपाय प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवते. ’’ ‘

टाटा टेक्नॉलॉजीज’सारख्या उत्तम तंत्रज्ञान भागीदाराच्या साह्याने आम्ही भारतातही आमचा ठसा उमटवत आहोत, असे यावेळी ‘बीएमडब्ल्यू’ समूहाच्या आयटी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अलेक्झांडर बुरेश म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT