Elon Musk X Sakal
Personal Finance

Tax on X Earnings: तुम्ही Twitter वरून पैसे कमवत आहात? तर भरावा लागेल 18% GST, काय आहे नियम?

Tax on X Earnings: युजर्सना मिळणाऱ्या उत्पन्नावर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.

राहुल शेळके

Tax on X Earnings: Twitter Xचे मालक इलॉन मस्क यांनी Twitter प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन सेवा सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर कंटेंट तयार करणाऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत. वापरकर्त्यांना जाहिरातींच्या कमाईत वाटा मिळावा यासाठी कंपनीने 'अ‍ॅड रेव्हेन्यू शेअरिंग प्लॅन' तयार केला आहे. पण आता युजर्सना अशा प्रकारे मिळणाऱ्या उत्पन्नावर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.

कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जीएसटी कायद्यानुसार 'अ‍ॅड रेव्हेन्यू शेअरिंग प्लॅन'मधून मिळणारे उत्पन्न परदेशातून 'पुरवठा' मानला जाईल. त्यामुळे ते एनकॅश केल्यावर, वापरकर्त्यांना 18 टक्के दराने कर भरावा लागेल.

'या' स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरही कर आकारला जाईल

एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीचे भाडे, बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याज किंवा इतर व्यावसायिक सेवांचे उत्पन्न एका वर्षात 20 लाख रुपयांच्या वर पोहोचल्यास त्यावर कर आकारला जाईल. सूट मिळालेल्या उत्पन्नावर जीएसटी आकारला जाणार नाही.

सध्या, व्यक्ती आणि संस्थांसाठी देशातील सेवांमधून वर्षभरात 20 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्नावर GST नोंदणी करावी लागते. मिझोराम, मेघालय आणि मणिपूर सारख्या राज्यांसाठी ही मर्यादा 10 लाख रुपये आहे.

या संदर्भात एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणतात की समजा एखाद्या व्यक्तीने बँकांकडून वार्षिक 20 लाख रुपयांचे व्याज उत्पन्न मिळवले.

तो यावर कोणताही जीएसटी भरत नाही किंवा त्याने जीएसटी नोंदणीही केलेली नाही. आता त्याच व्यक्तीने ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवरून 1 लाख रुपये कमावले तर 20 लाख रुपयांची मर्यादा ओलांडताच त्याला 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.

ट्विटरचे उत्पन्न

अलीकडेच Twitter (X) ने आपल्या प्रीमियम ग्राहकांसाठी आणि संस्थांसाठी 'अ‍ॅड रेव्हेन्यू शेअरिंग प्लॅन' सादर केला आहे. ट्विटरवरून अशा प्रकारे कमाई करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीच्या फॉलोअर्सची संख्या किमान 500 असावी आणि तीन महिन्यांमध्ये पोस्टवर 15 दशलक्ष इंप्रेशन असावेत अशी अट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT