TCS have to pay around 1,750 crore to rival company dxc know reason  Sakal
Personal Finance

Tata Group: अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा झटका! 1,750 कोटी देण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

TCS Infringement Case: कंपनीने ज्युरीच्या निर्णयाशी असहमती व्यक्त केली आहे.

राहुल शेळके

TCS Infringement Case: टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. अमेरिकन ज्युरीने कंपनीला 210 दशलक्ष डॉलर किंवा सुमारे 1750 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यास सांगितले आहे. अहवालानुसार, टीसीएस व्यवस्थापनाने ज्युरीच्या या निर्णयाशी असहमती व्यक्त केली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार TCS वर अमेरिकन IT कंपनी DXC ने (पूर्वी DXC Bancs म्हणून ओळखली जाणारी) आरोप केले आहेत. DXC च्या मते, TCS ने बँकिंग प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट विमा प्रकरणासाठी परताव्याचा दर मोजू शकणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात अडचणी येत होत्या.

व्हँटेज सॉफ्टवेअर हे काम सहजपणे करत असल्याचे त्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यानंतर त्याने व्हँटेजचा सोर्स कोड कॉपी करून वापरला. DXC ने खटल्यासोबत संबंधित TCS कर्मचाऱ्यांचे ईमेल तपशील देखील दिले आहेत.

टीसीएसचे म्हणणे आहे की ज्युरीच्या निर्णयाशी असहमत आहेत. टीसीएसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या प्रकरणावर आता न्यायालय निर्णय घेईल. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. टीसीएसने सांगितले की हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने ते या विषयावर अधिक भाष्य करणार नाही.

TCS कंपनी टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे आणि कंपनीचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. बाजार मूल्यानुसार, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. त्याचे बाजार भांडवल 12.65 लाख कोटी रुपये आहे. गेल्या शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.55 टक्क्यांच्या घसरणीसह 3454 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT