TCS Hiring Sakal
Personal Finance

TCS Hiring: TCS कंपनीचा मोठा निर्णय! 40 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नोकऱ्या, असा आहे प्लॅन

TCS Hiring: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नोकर भरती जाहीर केली आहे.

राहुल शेळके

TCS Hiring: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. जागतिक मंदीमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आर्थिक मंदीच्या भीतीचा परिणाम विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

अलीकडेच अनेक आयटी कंपन्यांनी जगभरातून लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. यातच आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नोकर भरती जाहीर केली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने 40,000 नोकर भरती जाहीर केली आहे. TCS कंपनीचे सीईओ एन गणपती सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे की कंपनी चालू आर्थिक वर्षात 40,000 कॅम्पस प्लेसमेंट नियुक्ती करण्याची योजना आखत आहे. असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन गणपती सुब्रमण्यम म्हणाले की, "आम्ही साधारणपणे 35,000 ते 40,000 लोकांना कामावर घेण्याची योजना आहे. इन्फोसिसचे सीएफओ निलांजन रॉय यांनी अलीकडे सांगितले होते की गेल्या वर्षी 50,000 कर्मचाऱ्यांची भरती केली होती.

एन गणपती सुब्रमण्यम म्हणाले , " गेल्या 12 ते 14 महिन्यांत कंपनीने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. हे किती काळ चालू राहील हे आम्हाला माहित नाही.''

कंपनीने 11 ऑक्टोबर रोजी चालू आर्थिक वर्षाच्या (जुलै-सप्टेंबर 2023) दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने सांगितले की सप्टेंबर तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा सुमारे 9% वाढून 11,342 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने म्हटले आहे की, आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणात ऑर्डर मिळाल्यामुळे त्यांचा नफा वाढण्यास मदत झाली.

कंपनी प्रति शेअर 9 रुपये लाभांश देणार

TCS ने पात्र भागधारकांना प्रति शेअर 9 रुपये लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने सांगितले की, 7 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीच्या त्या इक्विटी भागधारकांना दिला जाईल, ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदवली गेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT