House Rent sakal
Personal Finance

घरभाड्यावरील ‘टीडीएस’

घरमालकाचा पॅन नसेल किंवा घरमालक अनिवासी असेल, तर घरभाड्यावर २० टक्के दराने करकपात करावी लागेल.

डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मधील बदलानुसार, कोणतीही व्यक्ती (कलम १९४-आयच्या दुसऱ्या तरतुदीनुसार वगळलेले सोडून) आर्थिक वर्षातील एका महिन्यासाठी किंवा काही दिवसांसाठी ५० हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे देत असेल, तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम १९४-आयबीनुसार, ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पाच टक्के दराने व १ ऑक्टोबर २०२४ नंतर दोन टक्के दराने प्रत्येक महिन्यात उद्गमकर कपात (टीडीएस) बंधनकारक आहे.

घरमालकाला वार्षिक तत्त्वावर घरभाडे देत असल्यास हा कर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा भाडे करारनामा वर्षाच्या आतमध्ये संपल्यास, कराराच्या शेवटच्या महिन्यात करकपात करावी लागते. करारनामा दोन आर्थिक वर्षांत विभागला गेला असेल, तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आणि दुसऱ्या आर्थिक वर्षात करार संपेल त्या महिन्यात कर कापावा लागतो.

घरमालकाचा पॅन नसेल किंवा घरमालक अनिवासी असेल, तर घरभाड्यावर २० टक्के दराने करकपात करावी लागेल. पॅन नसल्यामुळे भाडेकरूला २० टक्के उद्गमकर कापावा लागला आणि हा कर शेवटच्या महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त असेल, तर भाड्याएवढी रक्कम उद्गमकर म्हणून कापली तरी चालू शकते.

मालकी संयुक्त नावाने?

भाड्याने घेतलेले घर किंवा इमारतीची मालकी एकापेक्षा जास्त मालकांकडे असेल, तर नव्या नियमानुसार, प्रत्येक मालकाच्या हिश्शानुसार उद्गमकर कापला पाहिजे. उदा. एका घराचे दरमहा भाडे एक लाख रुपये आहे आणि त्याची मालकी राम व श्याम या दोघांकडे ८० टक्के आणि २० टक्के अशी असल्यास घरभाडेही त्याप्रमाणात म्हणजे रामला ८० हजार रुपये व श्यामला २० हजार रुपये असे दिले जाईल. यात रामला दिलेले भाडे ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे त्याला दिलेल्या भाड्यावर दोन टक्के उद्गमकर कापावा लागेल. श्यामला दिलेले भाडे दरमहा ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे त्यावर उद्गमकर कापावा लागणार नाही.

उद्गम कर कधी भरावा?

ज्या महिन्यात उद्गमकर कापला आहे तो महिना संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत फॉर्म २६ क्यूसीमध्ये चलन भरून जमा करावा लागतो. निवासी भारतीयाला घरभाडे दिल्यास टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर (टॅन) घेणे गरजेचे नाही. भाडेकरूचा व मालकाचा पॅन भरून २६ क्यूसी फॉर्मसोबत पैसे भरावे लागतात. करदात्याला प्राप्तिकर खात्याच्या ‘ट्रेसेस’च्या संकेतस्थळावर नोंदणी करून १५ दिवसांच्या आत फॉर्म १६ सी डाऊनलोड करून मालकाला द्यावा लागते.

उद्गम कर वेळेत न भरल्यास ?

फॉर्म २६ क्यूसी भरण्यास विलंब झाल्यास दररोज २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागते. हे शुल्क उद्गमकरापेक्षा जास्त नसते. उदा. एखाद्या करदात्याने कर भरण्यास १२० दिवसांचा विलंब केल्यास दररोज २०० रुपये प्रमाणे २४,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल; परंतु उद्गमकरच २० हजार रुपये असल्यास विलंब शुल्कही २०,००० रुपयांपर्यंतच मर्यादित असेल.

अनिवासी भारतीयांना देणी

अनिवासी भारतीयांना कोणतेही उत्पन्न निवासी भारतीयाने दिले असेल, तर कलम १९५च्या तरतुदी लागू होतात. यानुसार भारतात लागू असणाऱ्या करदरानुसार उद्गमकर भरावा लागतो. निवासी भारतीयांना देणी देताना लागू असलेल्या किमान रकमेच्या मर्यादा अनिवासी भारतीयांना लागू नाहीत.

उदा. निवासी भारतीयांना दरमहा ५० हजार रुपयांपेक्षा जास्त घरभाडे दिले असेल, तरच उद्गमकराच्या तरतुदी लागू होतात; परंतु अनिवासी भारतीयांना दिलेली कमी रक्कमदेखील करकपातीस पात्र असते. त्यांचा ‘टॅन’ घेऊन त्यावर उद्गमकर भरावा लागतो व त्याचे त्रैमासिक विवरणपत्रदेखील दाखल करावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT