Dell Layoffs Sakal
Personal Finance

Dell Layoffs: डेल कंपनीचा मोठा निर्णय! अनेक मोठ्या अधिकाऱ्यांसह 12,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची केली कपात

Dell Layoffs: तंत्रज्ञान उद्योगातील कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढत आहे. इंटेलनंतर आता जगातील आघाडीची संगणक उत्पादक कंपनी डेलनेही मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीच्या या कपातीचा संपूर्ण जगावर परिणाम होईल.

राहुल शेळके

Dell Layoffs: तंत्रज्ञान उद्योगातील कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढत आहे. इंटेलनंतर आता जगातील आघाडीची संगणक उत्पादक कंपनी डेलनेही मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीच्या या कपातीचा संपूर्ण जगावर परिणाम होईल.

डेल आपल्या सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकेल. यामुळे 12,500 कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. या कपातीचा सर्वात मोठा परिणाम विक्री विभागावर होणार आहे. या निर्णयाचा कंपनीच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर परिणाम झाल्याचा दावा केला जात आहे.

एआयमुळे कर्मचारी कपात?

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, डेलने कर्मचाऱ्यांना मेमोद्वारे लेऑफ योजनेची माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे की, सेल्स टीममध्ये बदल करणार आहे. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित विक्री युनिटही तयार करण्यात येणार आहे.

कंपनीला AI वर फोकस वाढवायचा आहे. मात्र, कंपनीने नेमक्या किती कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे याची माहिती दिलेली नाही. परंतु, 10 टक्क्यांहून अधिक कर्मचारी प्रभावित झाले आहेत असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

हा अंतर्गत मेमो डेलचे वरिष्ठ अधिकारी बिल स्कॅनेल आणि जॉन बायर्न यांनी पाठवल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्याला ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन अपडेट असे नाव देण्यात आले आहे. व्यवसायाला नवी दिशा देण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगण्यात आले. कंपनीची पुनर्रचना आणि गुंतवणुकीचे प्राधान्यक्रमही बदलत आहेत. आम्हाला आमच्या विक्रीबद्दल पुन्हा विचार करण्याची गरज आहे.

डेलच्या विक्री विभागातील अनेक कर्मचारी दावा करत आहेत की त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. या कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा परिणाम व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्षांसारख्या वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांवर झाला आहे. त्यापैकी काही 20 वर्षांहून अधिक काळ कंपनीशी संबंधित होते. अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT