Tech Mahindra to hire 6000 freshers this year
Tech Mahindra to hire 6000 freshers this year  Sakal
Personal Finance

Jobs In IT Sector: आयटी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीत फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी; 6,000 कर्मचाऱ्यांची करणार भरती

राहुल शेळके

Tech Mahindra Job: आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टेक महिंद्राने या वर्षी म्हणजे 2025च्या आर्थिक वर्षात 6000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. कंपनीने 25 एप्रिल रोजी ही माहिती दिली. बहुतेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे आणि नवीन भरती करणार नाही असे सांगितले आहे. यातच टेक महिंद्राने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. FY24 मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 6,945 ने कमी झाली.

आयटी कंपनीचे हे दुसरे आर्थिक वर्ष आहे जेव्हा वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यापूर्वी, कंपनीने आर्थिक वर्ष 2018 मध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती दिली होती. टेक महिंद्रा व्यतिरिक्त, आत्तापर्यंत फक्त TCS ने सांगितले आहे की ते FY25 मध्ये सुमारे 40,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखत आहे.

टेक महिंद्राचे एमडी आणि सीईओ यांचे विधान

निकालानंतर, टेक महिंद्राचे एमडी आणि सीईओ मोहित जोशी म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. आम्ही सतत नवीन पदवीधरांना नियुक्त करत आहे. ते म्हणाले, आम्ही नवीन चीफ लर्निंग ऑफिसर अंतर्गत या नवीन लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक कार्यक्रम देखील तयार करत आहोत. आम्ही नवीन फ्रेशर्सची संख्या वाढवत आहोत."

25 एप्रिल रोजी CFO रोहित आनंद यांनी सांगितले की, 2027 पर्यंत टेक महिंद्राच्या धोरणाचा एक भाग म्हणून, कंपनी नवीन कर्मचारी तयार करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे यावर लक्ष केंद्रित करेल. यामुळे मार्जिन सुधारण्यास मदत होईल.

टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोमध्येही कर्मचारी कमी झाले आहेत

FY24 मध्ये, TCS, Infosys आणि Wipro या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण झाली आहे. टीसीएस आणि इन्फोसिसमध्ये गेल्या दशकात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षात TCS मध्ये 13,249 कर्मचारी, Infosys मध्ये 25,994 आणि Wipro मध्ये 24,516 कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon at Kerala: मॉन्सून प्रगतीपथावर, चोवीस तासात केरळमध्ये लावणार हजेरी; महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : उद्यापासून मध्य रेल्वेचा ६२ तासांचा मेगाब्लॉक; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द होणार

Ankush Gupta Research : मोबाईल लॅपटॉप अन् इलेक्ट्रिक कार.. १ मिनिटात चार्ज होणार ; भारतीय संशोधकाने बनवले 'हे' तंत्रज्ञान

Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपींना 20 वर्षे सक्तमजुरी

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

SCROLL FOR NEXT