Tesla filed trademark infringement case in Delhi High Court  Sakal
Personal Finance

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Tesla Delhi HC Case: अलीकडेच इलॉन मस्कची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने एका भारतीय कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण ट्रेडमार्क उल्लंघनाशी संबंधित आहे. टेस्ला पॉवर इंडिया या भारतीय कंपनीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल शेळके

Tesla Delhi HC Case: अलीकडेच इलॉन मस्कची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने एका भारतीय कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण ट्रेडमार्क उल्लंघनाशी संबंधित आहे. टेस्ला पॉवर इंडिया या भारतीय कंपनीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इलॉन मस्कची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने टेस्ला पॉवर इंडियाला टेस्ला ट्रेडमार्क वापरण्यापासून थांबवण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीच्या वतीने न्यायालयात हजर झालेले ज्येष्ठ वकील चंदर लाल यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेडमार्कच्या गैरवापरामुळे अमेरिकन कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे आणि कंपनीच्या व्यावसायिक हितसंबंधांवर परिणाम होत आहे.

त्यांनी असेही सांगितले की कंपनीच्या नावाचा वापर ग्राहकांना गोंधळात टाकत आहे आणि टेस्ला पॉवरच्या बॅटरीविरूद्धच्या तक्रारी अमेरिकन कंपनी EV निर्मात्या टेस्लाकडे पाठविल्या जात आहेत कारण ग्राहकांनी असे मानले आहे की ते इलॉन मस्कच्या कंपनीशी संबंधित आहेत.

त्याच वेळी, चंदर लाल यांनी आरोप केला की गुरुग्रामस्थित कंपनी टेस्ला पॉवर आपल्या बॅटरीची जाहिरात करत आहे, ज्यामध्ये ती स्वतःला इलेक्ट्रिक वाहन कंपनी म्हणून दाखवत आहे.

अमेरिकन कंपनीच्या याचिकेनंतर न्यायालयाने गुरुग्रामस्थित कंपनी टेस्ला पॉवरला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 मे रोजी होणार आहे. टेस्ला पॉवरचे म्हणणे आहे की ते बर्याच वर्षांपासून व्यवसायात आहे आणि ते वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक बॅटरी तयार करतात.

टेस्ला पॉवरचे मनोह पाहवा यांनी ही माहिती दिली

टेस्ला पॉवरचे मनोह पाहवा म्हणाले की, त्यांची कंपनी भारतात आधीच अस्तित्वात आहे, त्यांनी सरकारकडून सर्व परवानग्या घेतल्या आहेत. इतकेच नाही तर मस्कचा टेस्लाशी संबंध असल्याचा दावाही कंपनीने कधीच केला नाही.

याशिवाय ईव्ही मार्केटमध्ये येण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. टेस्ला ट्रेडमार्क असलेली जाहिरात ई-अश्व नावाच्या दुसऱ्या कंपनीशी संबंधित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टेस्ला पॉवरने असा युक्तिवाद केला की ते ईव्ही बॅटरीचे उत्पादन करत नाही.

त्याऐवजी, ते पारंपारिक वाहने आणि इन्व्हर्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या लीड ॲसिड बॅटरी विकत आहे. टेस्ला ट्रेडमार्क असलेली जाहिरात ई-अश्व नावाच्या दुसऱ्या कंपनीची आहे. ज्यासोबत टेस्ला पॉवरची ब्रँडेड उत्पादने विकण्यासाठी धोरणात्मक भागीदारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Balaji Temple Record Gold Donation : तिरुपती बालाजीच्या चरणी भक्तीचा अनोखा महासागर! चेन्नईच्या जैन दाम्पत्याने अर्पण केले तब्बल १२१ किलो सोने अन् २३८ कॅरेट हिरे; किंमत पाहून व्हाल थक्क!

Paternity Leave: CM विजय यांचा क्रांतिकारी निर्णय; आता बाळाच्या जन्मावेळी वडिलांनाही मिळणार १५ दिवसांची सुट्टी

IPL 2027 Trade: ... तर हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स संघात असता, पण दोन खेळाडूंमुळे फिस्कटली डील

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

Latest Marathi News Live Update: ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर रामदास कदमांचा नवा दावा; 'माझ्याकडे आणखी...'

SCROLL FOR NEXT