Tesla To Cut 693 Jobs In Nevada Amid Global Workforce Reduction Government Notice  Sakal
Personal Finance

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Tesla To Cut 693 Jobs: इलॉन मस्कची टेस्ला कंपनी कमी होत चाललेली विक्री आणि वाढती स्पर्धा यामुळे जगभरातील 10 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. या योजनेचा भाग म्हणून कंपनी स्पार्क्स, नेवाडा येथील 693 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे

राहुल शेळके

Tesla To Cut 693 Jobs: इलॉन मस्कची टेस्ला कंपनी कमी होत चाललेली विक्री आणि वाढती स्पर्धा यामुळे जगभरातील 10 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. या योजनेचा भाग म्हणून कंपनी स्पार्क्स, नेवाडा येथील 693 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे, असे जाहीर करण्यात आलेल्या सरकारी नोटीसमध्ये म्हटले आहे.

यूएस कामगार कायद्यानुसार, जर एखाद्या कंपनीने 100 किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले तर कंपनीला 60 दिवस अगोदर कर्मचाऱ्यांना कळवावे लागते.

विक्रीतील घसरण आणि कंपनीतील गोंधळाचा परिणाम टेस्लाच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. या वर्षी, टेस्लाचे शेअर्स 40 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत आणि S&P 500 निर्देशांकातील तो दुसरा सर्वात वाईट कामगिरी करणारा शेअर बनला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात घट झाली आहे.

मार्केटिंग टीम व्यतिरिक्त टेस्लाने इतर काही विभागातील कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकले आहे. गेल्या आठवड्यात, इलॉन मस्क म्हणाले होते की, कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे जगभरातील टेस्ला कर्मचाऱ्यांपैकी 10% पेक्षा जास्त कर्मचारी प्रभावित होतील.

काही काळापूर्वी, ब्लूमबर्गने आपल्या एका अहवालात दावा केला होता की इलॉन मस्कला कंपनीचे कर्मचारी 20 टक्के कमी करायचे आहेत. असे झाल्यास सुमारे 20 हजार कर्मचारी कंपनीबाहेर जातील.

गुंतवणूकदारांची चिंता वाढली

जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मंदावली आहे आणि बाजारपेठेतील स्पर्धाही सातत्याने वाढत आहे. या कारणास्तव, गुंतवणूकदार मस्कवर कंपनीच्या मार्केटिंगकडे अधिक लक्ष देण्यासाठी दबाव आणत आहेत. मार्चमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत टेस्लाच्या निव्वळ नफ्यात 55 टक्के घट झाली आहे. जानेवारी-मार्च दरम्यान, कंपनीचा महसूल 9 टक्क्यांनी घसरून 21.3 अब्ज डॉलर झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 23.33 अब्ज डॉलर होता.

टेस्लाने म्हटले आहे की ते या वर्षाच्या अखेरीस आपल्या कारखान्यात नवीन आणि अधिक परवडणारी वाहने बनवणार आहे. याचा परिणाम असा होईल की किमत पूर्वीपेक्षा कमी होऊ शकते आणि उत्पादित वाहनांची संख्या वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

Bidkin Accident : अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुचाकीचा अपघात; एक तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

Gas Leakage : बोईसर तारापूरमध्ये वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT