India's services sector shows strongest growth rates in around 14 years Sakal
Personal Finance

Service Sector : देशातील सेवा क्षेत्राची वाढ संथ; तरीही गेल्या १४ वर्षांतील रेकॉर्ड मोडला

मुंबई - देशातील सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग एप्रिलमध्ये किंचित मंदावला असला, तरीही तो गेल्या १४ वर्षांतील सर्वोत्तम आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशातील सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग एप्रिलमध्ये किंचित मंदावला असला, तरीही तो गेल्या १४ वर्षांतील सर्वोत्तम आहे. एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अॅक्टिव्हिटी निर्देशांक एप्रिलमध्ये ६०.८ वर आला असून, मार्चमध्ये तो ६१.२ होता. मार्चच्या तुलनेत त्यात अल्प घट झाली आहे. असे ‘एचएसबीसी इंडिया’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

एचएसबीसी इंडिया काम्पोझिट पीएमआय आउटपूट इंडेक्स एप्रिलमध्ये ६१.५ नोंदवला गेला असून, मार्चमध्ये तो ६१.८ होता, असेही यात नमूद करण्यात आले आहे. नव्या ऑर्डर वाढल्याने देशांतर्गत मागणीत लक्षणीय वाढ झाली असून, निर्यातीतही गेल्या दहा वर्षांतील दुसरी सर्वाधिक वाढ झाली आहे. अनुकूल आर्थिक वातावरण, वाढती मागणी आणि नवी कामे यामुळे सेवा क्षेत्राने नोंदवलेली वाढ गेल्या १४ वर्षांतील सर्वाधिक आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

एप्रिलमध्ये उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. मात्र, सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग काहीसा कमी होता. नव्या कामांच्या ऑर्डर वाढल्या असल्या, तरी काही मोजक्या कंपन्यांनीच नवी कर्मचारी भरती केली.

बहुतांश कंपन्यांनी सध्याच्या गरजेनुरुप आवश्यक मनुष्यबळ असल्याचे सांगितले. त्यामुळे देशातील एप्रिलमध्ये नवे कर्मचारी घेण्याचा वेगही मार्चच्या तुलनेत कमी होता.

सेवा कंपन्यांमधील नवा निर्यात व्यवसाय मात्र, जवळपास दहा वर्षांच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाच्या वेगाने वाढला आहे. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि आखाती देशांकडून चांगला नफा मिळाला आहे. त्याचप्रमाणे एकूण विक्रीतील वाढ ही दीर्घकालीन सरासरीपेक्षा चांगली आणि १४ वर्षांतील सर्वांत मजबूत होती, असे ‘एचएसबीसी’चे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले.

आर्थिक आणि विमा क्षेत्रातील उलाढालींमध्ये चांगली वाढ झाली असून, ग्राहक सेवा क्षेत्राने इनपुट खर्चात सर्वाधित वाढ नोंदवली आहे. फळे, भाजीपाला, कामगार वर्गाची मजुरी यातील वाढीमुळे एप्रिलमध्ये खर्चात अधिक वाढ झाली. अर्थात, मार्चच्या तुलनेत महागाईचा दर कमी होता.

मागणी वाढल्यामुळे कंपन्यांनी अतिरिक्त खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकला असला, तरीही वाढवलेल्या किमती मार्चमध्ये नोंदवलेल्या सात वर्षांतील उच्चांकापेक्षा कमीच होत्या. इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्यातीतील वाढ, नव्या कामांचे वाढते प्रमाण आणि १४ वर्षांतील सर्वांत मजबूत विक्रीतील वाढ यामुळे सेवा क्षेत्राची कामगिरी चांगली झाली आहे. आगामी काळातही सेवा आणि उत्पादन क्षेत्राची वाढ उत्तम होण्याची अपेक्षा आहे.

- प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, एचएसबीसी इंडिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT