oil india sakal
Personal Finance

Oil India Ltd : ऑईल इंडियाच्या शेअर्समध्ये येत्या काळात येणार मजबूत तेजी... कारण काय ते वाचा ?

Oil India share latest news in marathi : महारत्न पीएसयू ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये दमदार परफॉर्म करत आहेत. अशात ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने ऑइल इंडियाच्या शेअर्सवर 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

महारत्न पीएसयू ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये दमदार परफॉर्म करत आहेत. अशात ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने ऑइल इंडियाच्या शेअर्सवर 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवले आहे. पण टारगेट 496 रुपयांवरून 663 रुपये प्रति शेअर करण्यात आली आहे. बीएसईवर 12 जुलैला ऑइल इंडियाच्या स्टॉकच्या बंद किंमतीपेक्षा हे 7 टक्क्यांनी जास्त आहे.

अलीकडच्या काही दिवसांत कंपनीचे गॅस उत्पादन दुपटीने वाढल्याने स्टॉक अधिक तेजीत असल्याचे मॉर्गन स्टॅनलीचे म्हणणे आहे. 2029 मध्ये ऑइल इंडियाची कमाई दुप्पट होईल, असा विश्वास मॉर्गन स्टॅनली यांनी व्यक्त केला आहे.

12 जुलैला ऑइल इंडियाचे शेअर्स वाढताना दिसून आले. सकाळी बीएसईवर हा शेअर 571 रुपयांच्या वाढीसह उघडला. दिवसभरात ते मागील बंद किमतीपेक्षा 18 टक्क्यांनी वाढला आणि 652.50 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले.

हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. व्यवहाराच्या शेवटी, शेअर 12 टक्क्यांनी मजबूत झाला आणि 617.65 रुपयांवर स्थिरावला. कंपनीचे मार्केट कॅप 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. जून 2024 अखेरीस, सरकारकडे कंपनीचे 56.66 टक्के आणि सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे 43.34 टक्के हिस्सा होता.

गेल्या एका वर्षात शेअरची किंमत 262 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. बीएसई डेटानुसार, आर्थिक वर्ष 2024 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत, कंपनीचा महसूल 5,756.73 कोटी होता आणि निव्वळ नफा 2,028.83 कोटी होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2024 साठी महसूल 22,129.79 कोटी नोंदवला गेला. या कालावधीत निव्वळ नफा 5,551.85 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेचा खून केला', राहुल गांधींचा मोदींवर घणाघात, नेमकं काय म्हणाले?

Suhas Kande : विमुक्त-भटक्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; आमदार कांदे यांचा आदेश

Satara News:'तोरण मारण्याच्या स्पर्धेत ८४ बैल'; बिदालमध्ये शौकिनांचा मोठा प्रतिसाद, घुमक, हलगीच्या कडकडाटाने रंगत

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा पती आहे KBC चा पहिला करोडपती; झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत झळकतेय

Sadhvi Pradnya निर्दोष कशा सुटल्या? वकीलांनी सांगितलं | Malegaon Case | Sakal News

SCROLL FOR NEXT