Threat to kill industrialist Mukesh Ambani once again  Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: उद्योगपती मुकेश अंबानींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; 20 कोटी रुपयांची केली मागणी

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

राहुल शेळके

Mukesh Ambani: उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि जर पैसे दिले नाहीत तर अंबानी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता.

धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिले होते की, “तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत”.

हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे, गामदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अँटिलियाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती.

मुकेश अंबानींची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती, तर नीता अंबानींना Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे. तसेच सीआरपीएफ ही अंबानी कुटुंबाच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा पुरवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT