Tata Group Sakal
Personal Finance

Tata Group: टाटांनी विकत घेतला आणखी एक ब्रँड, 4,621 कोटींची झाली डील

Tata Group: टाटा समूहाच्या टायटनने कंपनीतील उर्वरित 27 टक्के हिस्सा खरेदी केला आहे.

राहुल शेळके

Tata Group: प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड कॅरेटलेनने आपला उर्वरित 27 टक्के हिस्सा विकला आहे. टाटा समूहाने कॅरेटलेनचा उर्वरित हिस्सा खरेदी केला आहे. त्यानंतर आता कॅरेटलेन पूर्णपणे टाटा समूहाचा ब्रँड बनला आहे.

शनिवारी टाटा समूहाच्या टायटन कंपनीने कॅरेटलेनमधील उर्वरित 27 टक्के भागभांडवलही विकत घेतले आहे. टाटा समूहाच्या टायटनने हिस्सा सुमारे 4,621 कोटींना विकत घेतला आहे.

टायटनकडे कंपनीमधील आधीच बहुसंख्य हिस्सा होता. या करारानंतर आता ज्वेलरी ब्रँड पूर्णपणे टायटनचा झाला आहे. कॅरेटलेनचे सीईओ साचेती आणि त्यांच्या कुटुंबाकडे कंपनीचे 91,90,327 इक्विटी शेअर्स आहेत. पण आता टायटनने हे शेअर्स विकत घेतले आहेत.

फ्लिपकार्ट नंतरची दुसरी सर्वात मोठी डील

टाटा कॅरेटलेनच्या खरेदीनंतरचा हा दुसरा सर्वात मोठा करार असेल. याआधी फ्लिपकार्टचे बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी वॉलमार्टमधील त्यांचे स्टेक विकले होते. फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टची डील अजूनही सर्वात मोठी डीलमध्ये आहे.

अडीच महिन्यांत हा करार निश्चित होईल

सध्या, कॅरेटलेनमध्ये टायटनचा हिस्सा 71.09 टक्के आहे. 21 टक्क्यांहून अधिक शेअर्स खरेदी केल्यानंतर, कॅरेटलेनमधील टायटनचा हिस्सा 98.28 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

टायटनला आशा आहे की हा करार 31 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजे अडीच महिन्यांत पूर्ण होईल. अडीच महिन्यांत, कराराच्या संदर्भात भारतीय स्पर्धा आयोगासह सर्व नियामक मान्यता पूर्ण होतील.

टायटनचा दागिन्यांचा व्यवसाय

टाटा समूहाचा टायटन आधीच दागिन्यांच्या व्यवसायात कार्यरत आहे. त्याच्या ज्वेलरी युनिटमध्ये आधीपासूनच तनिष्कसारखा ब्रँड आहे. आता त्याच्याकडे कॅरेटलेनही आहे.

2022-23 मध्ये टायटनच्या ज्वेलरी युनिटची उलाढाल 31,897 कोटी रुपये होती. हे टायटनच्या एकूण उलाढालीच्या 88 टक्के इतके आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT