(ambika mahila co industry president kamal shankar pardeshi passed away) sakal
Personal Finance

Kamal Pardeshi : आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन कमल परदेशी यांचे निधन

शेतमजूर महिला ते उद्योजिका असा थक्क करणारा त्यांचा प्रवास आहे.

सकाळ वृत्तसेवा

खुटबाव : खुटबाव (ता.दौंड) येथील आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन म्हणून परिचित असणाऱ्या अंबिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा कमल शंकर परदेशी (वय ६३) यांचे निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होत्या.

(ambika mahila co industry president kamal shankar pardeshi passed away)

पुण्याच्या ससून रुग्णालयात त्यांनी मंगळवारी (ता.२) दुपारी एक वाजता अखेरचा श्वास घेतला. रात्रीच्या सुमारास खुटबाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे पती, तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.


शेतमजूर महिला ते उद्योजिका असा थक्क करणारा त्यांचा प्रवास आहे. खुटबाव व भांडगाव परिसरातील खुरपणी करणाऱ्या १० महिलांची एकजूट करून त्यांनी भांडगाव (ता.दौंड) येथे श्री अंबिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेचे उभारणी केली.

त्यानंतर व्यवसाय वाढल्याने घरातील २०० महिलांना अंबिका महिला बचत गट व‌ अंबिका महिला औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला. महिलांना रोजगार मिळण्यासाठी सुरुवातीस स्वतःच्या घरी मसाले तयार करत त्यांनी बँकेच्या माध्यमातून कर्ज उभारून अंबिका औद्योगिक संस्थेची स्थापना केली व दर्जेदार मसाला उत्पादनात सुरुवात झाली.

मसाले व्यवसाय सातासमुद्रापार नेण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. आज अंबिका नावाने ब्रँडने प्रचलित मसाला जगभरात नऊ देशामध्ये विकला जात आहे. त्यांचे अंबिका मसाले नावाने ३२ फ्लेवर मार्केटमध्ये विकले जात आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत नाबार्डने त्यांना जागतिक आर्थिक शिखर परिषदेतर्फे सन्मानित केले.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते रणरागिणी पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांना २०२१ मध्ये आयसीएसआरचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय सावित्री सन्मान असोशिएशन व सेवाश्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अशा अनेक त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निधनाने दौंड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT