Pan Card Adhar card Link esakal
Personal Finance

Pan Card Adhar card Link: पॅन कार्ड ‘आधार’ला लिंक नाही म्हणून पाच हजारांचा दंड ? जाणून घ्या सत्य

Pan Card Adhar card Link Fact Check:पॅन-आधार लिंक नसल्याने धावपळ, हजार रुपये आकारणी : पाच हजार दंडाच्या चर्चेने धाबे दणाणले

CD

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : पॅनकार्डचे आधार कार्डशी लिंकिंग न केलेल्यांना वर्षभरापासून एक हजाराचा दंड आकारला जाऊ लागला आहे. जवळपास पाच वर्षांपासून यासाठी केंद्र सरकारकडून आवाहन केले होते, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा दंड आकारला जाऊ लागला आहे. पॅनकार्डचे आधार कार्डशी लिंकिंग नसल्याने कोणतेही आर्थिक व्यवहार होत नाहीत. त्यामुळे लिकिंग न केलेल्यांची धावपळ होत आहे. त्यातच हा दंड आणखी वाढून जवळपास पाच हजार रुपयांपर्यंत होणार असल्याच्या चर्चेनेही अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Pan Card Adhar card Link Fact check

लिंकिंग नि:शुल्क करण्यासाठी जवळपास पाच वर्षांपासून आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे गतवर्षी केंद्र सरकारच्या आयकर विभागाने एक हजार रुपये दंडाचे परिपत्रक काढले. त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची पॅनकार्डचे आधार कार्डशी लिंकिंग करण्यासाठी पळापळ होत आहे. त्यातच या दंडाची रक्कम वाढून पाच हजार रुपये होणार असल्याच्या चर्चेनेही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत ही जरी चर्चा असली तरी याबाबत कोणतेही आदेश आयकर विभागाकडून काढलेले नाहीत.

लिंकिंग नसल्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या एक हजार रुपये दंड भरून लिंकिंग केले जात आहे. चार्टर्ड अकौंटंट, इन्कम टॅक्स कन्स्लटंट, आपले सेवा केंद्र या माध्यमातून ऑनलाईनद्वारे हे लिंकिंग केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Reaction: कॅप्टन्सी पण गेली अन् संघातूनही काढलं, नव्या कर्णधारासह टीम जाहीर होताच काय म्हणाला सूर्या?

India Nepal Dispute: भारत-नेपाळ संबंधांमध्ये मोठी हालचाल! बालेन शहा सरकार भारतासमोर ४ अटी ठेवणार; आणखी एक मोठा राजनैतिक डाव

नाना पाटेकरांनी खरंच कानाखाली मारली मग मी पण दिली एक ठेवून... अभिनेत्रीने सांगितला 'यशवंत' सिनेमाचा किस्सा

Latest Marathi News Update: धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहित

Mumbai Crime: पाच महिन्यांनी हत्येचा उलगडा, नाल्याच्या चेंबरमध्ये आढळला कुख्यात गँगस्टरचा सांगाडा

SCROLL FOR NEXT