UAN Mandatory: UAN mandatory for all workers for government facilities, government in preparation.
UAN Mandatory: UAN mandatory for all workers for government facilities, government in preparation. Sakal
Personal Finance

UAN Mandatory: आता सर्व कामगारांना UAN नंबर अनिवार्य असणार? काय आहे सरकारचा प्लॅन?

राहुल शेळके

UAN Mandatory: सरकारशी संबंधित विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असणे आवश्यक आहे. कामगार मंत्रालय यासाठी तयारी करत असून लवकरच ते अनिवार्य केले जाऊ शकते. सध्या ज्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये खाते आहे त्यांच्याकडे UAN क्रमांक आहे.

परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना किंवा ज्यांचा पीएफ कापला जात नाही त्यांच्याकडे यूएएन क्रमांक नाही. सरकार आता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर अनिवार्य करु शकते. असे वृत्त दैनिक जागरण दिले आहे.

कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम पोर्टलद्वारे UAN जारी केले जात आहे. भविष्यात, सर्व प्रकारच्या कामगारांसाठी, संघटित किंवा असंघटित, अटल पेन्शनसारख्या कोणत्याही सरकारी आर्थिक योजनांचा किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अंतर्गत उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी UAN असणे आवश्यक असेल. असंघटित क्षेत्रातील लोक ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून UAN क्रमांक मिळवू शकतात. ई-श्रम पोर्टलवर 29 कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे.

सध्या अटल पेन्शनसाठी UAN अनिवार्य नाही

मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा फायदा हा असेल की किती लोक सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत याची संपूर्ण माहिती सरकारकडे असेल.

आता बरेचदा असे घडते की कोणी असंघटित क्षेत्रातली नोकरी सोडून व्यवसाय करू लागतो, पण जर त्याच्याकडे UNA असेल तर तो त्या आधारे सरकारी फायद्यांशी जोडला जाऊ शकतो आणि सरकारला देखील कळेल की प्रत्यक्षात किती लोक काम करत आहेत. सध्या UAN अटल पेन्शनमध्ये नोंदणी करणे अनिवार्य नाही, परंतु भविष्यात अशा योजनांमध्ये सामील होण्यासाठी UAN देखील अनिवार्य केले जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिशेने वेगाने काम केले जात असून इतर मंत्रालयांशीही समन्वय साधला जात आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्याची अधिसूचना जारी केली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT