Uday Kotak loses 10,225 crore in a day as Kotak Mahindra Bank share price tanks 11 percent  Sakal
Personal Finance

Uday Kotak: आरबीआयचा एक निर्णय अन् उदय कोटक यांचे 10,225 कोटी रुपयांचे नुकसान; काय आहे प्रकरण?

Uday Kotak Networth: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर, गुरुवारी 25 एप्रिल 2024 रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 12 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. कोटक महिंद्रा बँकेत गुंतवणूक करणाऱ्या संस्थात्मक आणि किरकोळ भागधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राहुल शेळके

Uday Kotak Networth: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर, गुरुवारी 25 एप्रिल 2024 रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 12 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. कोटक महिंद्रा बँकेत गुंतवणूक करणाऱ्या संस्थात्मक आणि किरकोळ भागधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पण कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि बिगर कार्यकारी संचालक उदय कोटक यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. कोटक बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे, उदय कोटक यांना 10,225 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

उदय कोटक यांची कोटक महिंद्रा बँकेत 25.71 टक्के भागीदारी आहे. काल शेअर सुमारे 10.85 टक्क्यांच्या घसरणीसह 1,643 रुपयांवर बंद झाला. कोटक बँकेचे सर्वात मोठे भागधारक असल्याने उदय कोटक यांचे मोठे नुकसान झाले आहे. 24 एप्रिल 2024 रोजी कोटक महिंद्रा बँकेचे मार्केट कॅप 3,66,383 कोटी रुपये होते, ते गुरुवारी 326,615 कोटी रुपयांवर आले आहे.

म्हणजेच एकाच सत्रात मार्केट कॅपमध्ये 39,768 कोटी रुपयांची घसरण झाली. शेअरमध्ये झालेल्या या घसरणीमुळे उदय कोटक यांच्या शेअर होल्डिंगचे बाजारमूल्य 10,225 कोटी रुपयांनी घटले. कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाल्यामुळे बँकेचे भागधारक असलेल्या म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांचेही नुकसान झाले आहे.

आरबीआयच्या कारवाईमुळे अडचणी वाढल्या

कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये ही घसरण आरबीआयच्या मोठ्या कारवाईमुळे झाली आहे. आरबीआयने बँकांना ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंगद्वारे नवीन क्रेडिट कार्ड ग्राहक तयार करण्यास बंदी घातली आहे. या बातमीमुळे कंपनीचा शेअर काल 12 टक्क्यांनी घसरून 1,620 रुपयांवर आला.

आरबीआयच्या या कारवाईनंतर अनेक ब्रोकरेज हाऊसनी बँकेच्या स्टॉकची टार्गेट किमत कमी केली आहे. त्यामुळे मार्केट कॅपच्या बाबतीत, ॲक्सिस बँक कोटक बँकेला मागे टाकून देशातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT