Blinkit Sakal
Personal Finance

Blinkit: ब्लिंकिट कंपनीला मोठा धक्का! 1 हजार कर्मचाऱ्यांंनी सोडली कंपनी; काय आहे कारण?

ब्लिंकिटचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते.

राहुल शेळके

Blinkit: ब्लिंकिट कंपनीचे संकट संपण्याचे नाव घेत नाही. देशाची राजधानी दिल्लीत 1000 ब्लिंकिट कर्मचाऱ्यांंनी स्विगी इंस्टामार्ट, झेप्टो आणि बीबी नाऊमध्ये सामील झाले आहेत.

हे सर्व कर्मचारी कंपनीच्या नवीन पेआउट स्ट्रक्चरवर नाराज आहेत. त्यामुळेच ते नव्या कंपन्यांकडे वळले आहेत.

नवीन पेआउट प्रकरण काय आहे?

या महिन्याच्या सुरुवातीला, झोमॅटोच्या मालकीच्या ब्लिंकिटने घोषणा केली की डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हना प्रति ट्रिप किमान 15 रुपये मिळतील. Economic Timesच्या अहवालानुसार, पूर्वी एका डिलिव्हरीवर 25 रुपये मिळायचे.

ब्लिंकिटच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांंचे म्हणणे आहे की कंपनीने त्यांचे प्रति ट्रिप मानधन कमी केली आहे. याला सर्व कर्मचाऱ्यांंचा विरोध आहे.

वृत्तानुसार, डिलिव्हरी कर्मचाऱ्यांंच्या विरोधामुळे दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरीदाबाद आणि गाझियाबादमधील अनेक स्टोअर्स गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत.

कंपनीच्या सततच्या प्रयत्नांनंतरही दिल्ली आणि गुरुग्राममधील अनेक स्टोअर्स अजूनही ग्राहकांसाठी उपलब्ध नाहीत. ब्लिंकिटची दिल्ली-एनसीआरमध्ये सुमारे 200 गोदामे आहेत. जिथून कर्मचारी 2 ते 3 किमीच्या परिघात ग्राहकांना माल पोहोचवत असत.

1000 कर्मचाऱ्यांंनी ब्लिंकिट सोडले:

या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने Economic Times ला सांगितले की, या विरोधापूर्वी कंपनीकडे दिल्ली आणि एनसीआरमध्ये सुमारे 3000 कर्मचारी होते.

यापैकी एक तृतीयांश लोक आठवडाभराच्या विरोधानंतर इतर कंपन्यांमध्ये रुजू झाले आहेत. सध्या किती लोक ब्लिंकिटसोबत आहेत हे सांगणे कठीण आहे. कारण गेल्या आठवड्यापासून कंपनी नवीन जॉईनिंग करत आहे.

गेल्या वर्षी ब्लिंकिटच्या कर्मचाऱ्यांंना प्रति ऑर्डर 50 रुपये मिळत होते पण नंतर ते 25 रुपये आणि आता अंतरानुसार 15 रुपये करण्यात आले कारण ब्लिंकिट स्टोअर्स दोन ते तीन किमीच्या आत काम करतात.

पेआउटमधील फरकामुळे कर्मचारी नाराज होते कारण यामुळे त्यांची कमाई कमी होईल. आपल्या अॅपवर वस्तूंची संख्या वाढवली जात असल्याचं कंपनीचं म्हणणं असलं तरी ग्राहकांची संख्या वाढली तर अधिक कमाई होईल, असं कर्मचाऱ्यांंच म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT