FM Nirmala Sitharaman announcements For Rural Development 
Personal Finance

Budget 2024: ग्राम विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद; 25 हजार गावात पक्के रस्ते बांधणार

Union Budget 2024 FM Nirmala Sitharaman announcements For Rural Development: लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने देश याकडे लक्ष ठेवून होता. ग्रामविकासाठी सरकारकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

कार्तिक पुजारी

Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. सातवेळा एका महिलेने अर्थसंकल्प सादर करण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. मोदी ३.० काळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प होता. लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने देश याकडे लक्ष ठेवून होता. ग्रामविकासाठी सरकारकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्रामविकासासाठी २.६६ लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ग्रामविकास आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ३ कोटी घरे बांधण्यात येतील, असं सीतारमण यांनी सांगितलं.

निर्मिता सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं की, मी यावर्षी ग्रामविकास आणि ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधांसाठी २.६६ लाख रुपयांची तरतूद करत आहे. सीतारमण यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या Pradhan Mantri Gram Sadak Yojana (PMGSY) चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. २५ हजार ग्रामीण भागांना रस्त्यांनी जोडण्याचा सरकारचा इरादा आहे.

अनेक गावांची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये रस्ते बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. अशा २५ हजार गावांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा चौथा टप्पा राबवला जाणार आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये देखील पक्का रस्ता पोहोचेल आणि लोकांना सुविधा मिळायला लागतील, असं त्या म्हणाल्या.

आदिवासी समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या सुधारणेसाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुरु केले जात आहे. ही योजना आदिवासी बहुल गावांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेच्या माद्यमातून ६३ हजार गावांना सामाविष्ट करून घेतले जाईल. यामुळे ५ कोटी आदिवासींना लाभ मिळेल असा दावा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT