Tax Saving Sakal
Personal Finance

Tax Saving: 50 हजाराच्या पगारावर किती कर लागणार? नवी करप्रणाली चांगली की जुनी?

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 23 जुलै रोजी अर्थसंकल्पात कराबाबत घोषणा केली. त्यांनी स्टँडर्ड डिडक्शन प्रति वर्ष 50,000 रुपये वरून 75,000 रुपये प्रति वर्ष केले. यासोबतच कररचनेतही सुधारणा करण्यात आली

राहुल शेळके

Budget 2024 Income Tax: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 23 जुलै रोजी अर्थसंकल्पात कराबाबत घोषणा केली. त्यांनी स्टँडर्ड डिडक्शन प्रति वर्ष 50,000 रुपये वरून 75,000 रुपये प्रति वर्ष केले. यासोबतच कररचनेतही सुधारणा करण्यात आली.

नवीन कर प्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत करबचतीबाबत लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे की जर त्यांचा पगार 50,000 रुपये किंवा 1 लाख रुपये असेल तर त्यांनी कोणती कर व्यवस्था निवडावी. तसेच किती कर भरावा लागेल?

सर्वप्रथम, हे जाणून घ्या की नवीन कर व्यवस्था बजेट 2023 पासूनच डिफॉल्ट आहे, म्हणजेच, जर तुम्ही कोणतीही कर व्यवस्था निवडली नाही तर नवीन कर व्यवस्था आधीच निवडली जाईल.

अशा परिस्थितीत तुमचा पगार 50,000 रुपये असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण तुमचा वार्षिक पगार फक्त 6 लाख रुपये आहे. याचा अर्थ तुम्ही कर श्रेणीत येत नाही.

1 लाखाच्या पगारावर कोणती कर व्यवस्था चांगली?

जर तुमचा पगार दरमहा 1 लाख रुपये असेल, तर तुम्ही नवीन कर प्रणाली किंवा जुनी कर व्यवस्था निवडू शकता. जर तुम्हाला 1 लाख रुपयांच्या पगारावर '0' कर भरायचा असेल, म्हणजे एक रुपयाही कर भरायचा नसेल, तर तुम्हाला OLD TAX REGIME निवडावी लागेल, परंतु त्यासाठी तुम्हाला काही दावे दाखवावे लागतील. जेणेकरून तुम्हाला कर सूट मिळू शकेल.

1 लाख रुपयांच्या पगारावर '0' कर कसा लावला जाईल?

तुम्हाला 1 लाख रुपयांच्या पगारावर 0 टॅक्स भरायचा असेल, तर तुम्हाला विविध प्रकारच्या गुंतवणुकीवर आणि रिइम्बर्समेंटवर कर सवलतीचा दावा करावा लागेल. वाहतूक, एलटीए, मनोरंजन, ब्रॉडबँड बिले, पेट्रोल बिले आणि मनोरंजन किंवा फूड कूपनसाठी देखील दावा केला जाऊ शकतो.

मेट्रो शहरांमध्ये 50% आणि नॉन-मेट्रोमध्ये 40% दराने HRA दिला जातो. एकूण भाड्यातून मूळ पगाराच्या 10 टक्के रक्कम वजा केल्यावर जी रक्कम उरते ती HRA म्हणून दावा केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, मेट्रो शहरात राहणारे लोक 20,000 रुपयांच्या मासिक भाड्यावर 1.80 लाख रुपयांच्या एचआरए सूटचा दावा करू शकतात.

जुनी करप्रणाली संपणार का?

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जुनी करप्रणाली संपणार यावर सध्या मी काहीही बोलू इच्छित नाही. देशात एक सोपी कर व्यवस्था हवी आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या कपातीचा लाभ घेऊ शकता. या प्रणालीमध्ये 2.5 रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्यांवर अद्याप कोणताही कर नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सूट वार्षिक 3 लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT