Valentine's Day 2024 uptick in sales for luxury brands centred around watches branded jewelry and items  Sakal
Personal Finance

Valentine's Day 2024: व्हॅलेंटाईन डे दिवशीच सर्वाधिक प्रेम विकत घेतलं जातं! काय आहे सत्य?

Valentine's Day 2024: जगभरात दरवर्षी 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकत्र येतात आणि इतरांना भेटवस्तू देतात. प्रत्येकाला आपल्या जोडीदारासाठी सर्वोत्तम भेटवस्तू द्यायची असते.

राहुल शेळके

Valentine's Day 2024: जगभरात दरवर्षी 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकत्र येतात आणि इतरांना भेटवस्तू देतात. प्रत्येकाला आपल्या जोडीदारासाठी सर्वोत्तम भेटवस्तू द्यायची असते. तसेच व्हॅलेंटाईन डेनिमित्त हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे प्री-बुकिंग सुरू असते. लोक व्हॅलेंटाईन डेची तयारी काही महिने आधीच करतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हॉटेल टुरिस्ट प्लेसवर हॉटेलच्या रुम पण मिळत नाहीत. कारण हॉटेल्सचे अगोदरच प्री-बुकिंग होते.

परंतु व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर लक्झरी वस्तूंची विक्री आणि हॉटेल बुकिंगचे प्रमाणात मोठी वाढ होते. Booking.com नुसार, The Oberoy Udaivilas आणि Fairmont Jaipur सारख्या हॉटेलच्या रुम 14 फेब्रुवारीसाठी उपलब्ध नाहीत.

रॅफल्स उदयपूरचे व्यवस्थापक राजेश नाम्बी यांनी सांगितले की, हॉटेलच्या बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. व्हॅलेंटाईन डेमुळे हॉटेलच्या रुमच्या दरांमध्ये 22-27% वाढ झाली आहे. (Valentine's Day 2024 uptick in sales for luxury brands centred around watches branded jewelry and items)

DLF रिटेलचे बिझनेस हेड पुष्पा बेक्टर, म्हणाले की, गेल्या वर्षीपेक्षा यावेळी मोठी विक्री होण्याची शक्यता आहे. या व्हॅलेंटाईन डेमध्ये घड्याळे, ब्रँडेड ज्वेलरी आणि डिझायनर हँडबॅग सारख्या वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या लक्झरी विक्रीत 40-50% वाढ झाली आहे. खाद्यपदार्थ आणि शीतपेयांना या वर्षी सर्वाधिक मागणी आहे.

Venchi सारख्या प्रीमियम आणि लक्झरी चॉकलेट ब्रँडच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे, असे CocoCart चे CEO करण आहुजा यांनी सांगितले. वेंची चॉकलेट्सची किंमत 800 ग्रॅम बारसाठी 7,295 रुपये आहे आणि 54 वेगवेगळ्या चॉकलेटच्या बॉक्ससाठी 64,500 रुपयांपर्यंत किंमत आहे.

फोर सीझन्स बेंगळुरूचे मार्केटिंग संचालक शलभ अरोरा म्हणाले की, व्हॅलेंटाईन डे पॅकेजसाठी हॉटेल बुकिंगमध्ये 20% वाढ झाली आहे, ज्यात रुम, स्पा, खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या सवलतीचा समावेश आहे.

हॉटेलमधील ‘जस्ट द टू ऑफ अस’ पॅकेजसाठी ज्यामध्ये खोलीतील व्हॅलेंटाईन डे सजावटी व्यतिरिक्त नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश आहे त्याचा प्रति रात्र दर 87,000 रुपये आहे.

लक्झरी वाहनात स्थानिक पिक अँड ड्रॉप आणि 90 मिनिटांच्या कपल स्पा ट्रीटमेंट यांसारख्या अतिरिक्त ऑफरसह ‘प्लॅन अ रोमँटिक गेटवे’ पॅकेजचा दर दोन व्यक्तींसाठी प्रति रात्र 1,05,000 रुपयांपासून सुरू होतो.

व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात लोक प्रवासाचे नियोजनही करतात. हॉटेल बुकिंगचे आकडे बघितले तर आपण अंदाज लावू शकतो की केवळ मोठी शहरेच नाही तर आता छोट्या शहरातील लोकही व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस साजरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT