Vedanta Demerger Sakal
Personal Finance

Vedanta Demerger: वेदांताचे 6 कंपन्यांमध्ये होणार डिमर्जर, शेअरहोल्डर्सना काय फायदा होणार?

Vedanta Demerge : अनिल अग्रवाल यांच्या वेदांता लिमिटेड कंपनीने डिमर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल शेळके

Vedanta Demerger: अनिल अग्रवाल यांच्या वेदांता लिमिटेड कंपनीने डिमर्जर करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या कंपन्या मूळ कंपनीतून डिमर्ज केल्या जातील. पॉवर, मेटल्स अॅल्युमिनियम, तेल आणि गॅस व्यवसायात गुंतलेली वेदांता कंपनी लिमिटेडपासून वेगळी केली जाईल आणि स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट केली जाईल.

कंपनीने सांगितले की, वेदांता अॅल्युमिनियम, वेदांता ऑइल अँड गॅस, वेदांता पॉवर, वेदांता स्टील फेरस मटेरियल्स, वेदांता बेस मेटल्स आणि वेदांता लिमिटेड या सहा वेगवेगळ्या कंपन्यांची यादी केली जाईल.

वेदांताने सांगितले की, वेदांता लिमिटेडच्या प्रत्येक शेअरसाठी, शेअरहोल्डर्सना नव्याने लिस्ट झालेल्या पाच कंपन्यांचा एक शेअर दिला जाईल.

वेदांत या 6 कंपन्यांमध्ये विभागली जाणार

वेदांता ग्रुप या निर्णयानुसार, व्यवसायांची 6 कंपन्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे (अॅल्युमिनियम, तेल आणि वायू, ऊर्जा आणि स्टील आणि इतर धातू).

  • वेदांता लिमिटेड (Vedanta Ltd)

  • वेदांता ऑइल अँड गॅस (Vedanta Oil and Gas)

  • वेदांता स्टील आणि फेरस  (Vedanta Steel & Ferrous)

  • वेदांता बेस मेटल (Vedanta Base Metals)

  • वेदांता पॉवर (Vedanta Power)

  • वेदांता अॅल्युमिनियम (Vedanta Aluminium)

कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा

वेदांताने अरुण मिश्रा यांना मुख्य कंपनी वेदांताचे सीईओ बनवले आहे. याशिवाय चार नवीन कंपन्यांचे सीईओ आणि एका कंपनीचे डेप्युटी सीईओ यांची नावेही जाहीर केली आहेत.

एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार

  • नवीन जाजू: सीईओ, वेदांता स्टील आणि फेरस

  • ख्रिस ग्रिफिथ: सीईओ, वेदांता बेस मेटल्स

  • विभव अग्रवाल: सीईओ, वेदांता पॉवर

  • जॉन स्लेव्हन: सीईओ, वेदांता अॅल्युमिनियम

  • स्टीव्ह मूर: डेप्युटी सीईओ, वेदांता ऑइल अँड गॅस

वेदांता हिंदुस्तान झिंकमध्ये 65% स्टेक कायम ठेवेल आणि कंपनी स्टेनलेस स्टील आणि सेमीकंडक्टर/डिस्प्ले व्यवसायातही गुंतवणूक करत राहील.

शेअरहोल्डर्सना काय फायदा होईल?

कंपनीच्या निवेदनानुसार, वेदांताच्या शेअरहोल्डर्सना नवीन कंपन्यांमध्येही भागभांडवल मिळेल. जर तुमच्याकडे वेदांताचे 20 शेअर्स असतील तर तुम्हाला इतर पाच नवीन कंपन्यांमध्ये 20-20 शेअर्स मिळतील.

शेअरहोल्डर्सना जारी केलेल्या निवेदनात अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनीही या याबाबत संकेत दिले होते. ते म्हणाले होते, 'वेगवेगळ्या व्यवसाय लिस्ट होणे म्हणजे तुमच्याकडे वेदांताचा एक शेअर असेल तर भविष्यात तुम्हाला इतर अनेक कंपन्यांचे शेअर्स मिळू शकतील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT