Vibrant Gujarat 2024 reliance maruti suzuki and tata group made big investment announcements
Vibrant Gujarat 2024 reliance maruti suzuki and tata group made big investment announcements  Sakal
Personal Finance

Vibrant Gujarat: रिलायन्स, मारुती आणि टाटा समूहाने गुजरातमध्ये केल्या गुंतवणुकीच्या मोठ्या घोषणा

राहुल शेळके

Vibrant Gujarat 2024: व्हायब्रंट गुजरात 2024 मध्ये भारत आणि परदेशातील मोठ्या कंपन्यांनी मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप, मारुती सुझुकी यांचा समावेश आहे. त्यांनी गुंतवणुकीसाठी केलेल्या घोषणांवर एक नजर टाकूया.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की रिलायन्स हजीरा येथे भारतातील पहिली आणि जागतिक दर्जाची कार्बन फायबर सुविधा उभारणार आहे. व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये बोलताना अंबानी म्हणाले की, रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील.

मुकेश अंबानी म्हणाले की, 2030 पर्यंत गुजरातच्या उर्जेच्या निम्म्या गरजा अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. रिलायन्सने जामनगरमध्ये 5,000 एकर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की, 2047 पर्यंत भारताला 35 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. मला वाटते तोपर्यंत एकट्या गुजरातची अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन डॉलर्सची होईल.

मारुती सुझुकी 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये गुजरातमधील गुंतवणुकीबाबत मोठ्या घोषणा केल्या.

सुझुकी मोटरचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी म्हणाले की, गुजरातमध्ये दुसरा कार प्लांट तयार करण्यासाठी आम्ही 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत, जे दरवर्षी 10 लाख कारचे उत्पादन करेल.

तोशिहिरो म्हणाले की, या प्लांटमधून उत्पादन सुरू झाल्यानंतर गुजरातमध्ये वार्षिक उत्पादन क्षमता 20 लाख युनिट्स असेल. सुझुकी मोटरची मारुती सुझुकी इंडियामध्ये सुमारे 58% भागीदारी आहे. 2030-31 पर्यंत 20 लाख युनिट्सची उत्पादन क्षमता वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

सध्या मारुती सुझुकी हरियाणा आणि गुजरातमधील त्यांच्या दोन कारखान्यांमध्ये दरवर्षी सुमारे 22 लाख युनिट्सचे उत्पादन करते. याशिवाय, मारुती पहिल्या टप्प्यात 11,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हरियाणातील सोनीपत येथे एक नवीन प्लांट देखील उभारत आहे.

टाटा समूह गुजरातमध्ये कारखाना उभारणार

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी घोषणा केली की कंपनी गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर कारखाना उभारणार आहे. व्हायब्रंट गुजरात समिट 2024 मध्ये, चंद्रशेखरन यांनी घोषणा केली की, टाटा समूह दोन महिन्यांत सानंदमध्ये लिथियम आयन बॅटरी बनवण्यासाठी 20 GW क्षमतेची गिगाफॅक्टरी सुरू करणार आहे.

चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा समूहाच्या 12 कंपन्या गुजरातमध्ये आहेत, 50 हजारांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे, सानंद हे इलेक्ट्रिक वाहन विभागाचे केंद्र बनत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT