Warren Buffett Backed Us Bank To Acquire Credit Card Issuer Company Sakal
Personal Finance

Warren Buffett: वॉरेन बफे करणार इतिहासातील सर्वात मोठी डील; आता 'या' क्षेत्रातील कंपनी घेणार विकत

Warren Buffett: अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफे मोठी डील करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची गुंतवणूक बँक कॅपिटल वन ही क्रेडिट कार्ड देणारी कंपनी डिस्कव्हर फायनान्शियल विकत घेणार आहे. क्रेडिट कार्ड उद्योगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी डील असेल.

राहुल शेळके

Capital One Warren Buffett: अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफे मोठी डील करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची गुंतवणूक बँक कॅपिटल वन ही क्रेडिट कार्ड विकणारी कंपनी डिस्कव्हर फायनान्शियल विकत घेणार आहे. क्रेडिट कार्ड उद्योगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी डील असेल. असे मानले जात आहे की त्याची किंमत 35.3 अब्ज डॉलर्स असेल. (Capital One to buy Discover Financial in $35.3 billion all-stock deal)

या करारानंतर कॅपिटल वन ही मालमत्तांच्या बाबतीत जगातील सहावी सर्वात मोठी बँक बनेल. त्याची स्पर्धा जेपी मॉर्गन आणि सिटीग्रुपशी असणार आहे. जर हा करार यशस्वी झाला, तर कॅपिटल वनच्या भागधारकांकडे विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या कंपनीतील 60 टक्के वाटा असेल तर उर्वरित भागभांडवल डिस्कव्हरच्या भागधारकांकडे असेल.

अमेरिकेतील क्रेडिट कार्ड उद्योगात आतापर्यंतची सर्वात मोठी डील बँक ऑफ अमेरिकाच्या नावावर आहे. 2005 मध्ये MBNA कॉर्प 35.2 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतले होते. पण वॉरन बफे आता इतिहास रचणार आहेत. जगातील श्रीमंतांमध्ये बफे यांचा समावेश होतो. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बफेची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 15.4 अब्ज डॉलरने वाढली आहे.

बफेटची कोणत्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे?

गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, बफेच्या एकूण पोर्टफोलिओपैकी निम्मी गुंतवणूक ॲपलमध्ये आहे. बफेटच्या पोर्टफोलिओमधील दुसरा सर्वात मोठा स्टॉक बँक ऑफ अमेरिका आहे. हे त्यांच्या एकूण पोर्टफोलिओच्या 9 टक्के आहे.

अमेरिकन एक्सप्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची 7.2 टक्के पोर्टफोलिओ या कंपनीत आहे. वॉरन बफे यांनीही कोका-कोलामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचा हिस्सा 7.1 टक्के आहे. बफे यांनी शेवरॉन, ऑक्सीडेंटल पेट्रोलियम, क्राफ्ट हेन्झ आणि मूडीजमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT