Aadhaar ATM Sakal
Personal Finance

Aadhaar ATM: पैसे काढण्यासाठी बँक आणि ATMमध्ये जाण्याची गरज नाही; अशा प्रकारे मिळवा घरबसल्या कॅश

Aadhaar ATM: बँका आणि एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे ऑनलाइन आधार ATM (AePS) सेवेचा लाभ घेऊन सहज पैसे काढू शकता.

राहुल शेळके

Aadhaar ATM: बँका आणि एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे ऑनलाइन आधार ATM (AePS) सेवेचा लाभ घेऊन सहज पैसे काढू शकता. या सुविधेअंतर्गत पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुम्हाला रोख रक्कम काढण्यास मदत करेल.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, जर तुम्हाला अचानक पैसे काढण्याची गरज भासली आणि तुमच्याकडे बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंटच्या आधार एटीएम सेवेचा (AePS) लाभ घेऊ शकता. तुम्ही घरबसल्या सहज पैसे काढू शकता. यामध्ये पोस्टमन तुमच्या घरी येऊन पैसे काढण्यास मदत करेल.

AePS म्हणजे काय?

AePS म्हणजे Aadhaar Enabled Payment System. याद्वारे कोणतीही व्यक्ती आपल्या बायोमेट्रिक्सचा वापर करून आधार लिंक केलेल्या खात्यातून सहज पैसे काढू शकते. यामध्ये तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज नाही आणि तुमचा वेळही वाचेल. जे लोक बँकेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही पद्धत खूप उपयुक्त आहे. AePS वापरण्यासाठी, ग्राहकाचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

रोख रक्कम काढण्याबरोबरच या सुविधाही उपलब्ध

आधार पेमेंट सिस्टममध्ये, ग्राहकाच्या आधारचा वापर करून रोख रक्कम काढता येते. याद्वारे तुम्ही शिल्लक तपासू शकता, रोख पैसे काढू शकता आणि पैसे पाठवू शकता. याशिवाय तुम्ही आधार ते आधार फंड ट्रान्सफर देखील करू शकता आणि खात्याचे मिनी स्टेटमेंट तयार करू शकता.

किती शुल्क आकारले जाईल?

IPPB ने त्यांच्या FAQ मध्ये माहिती दिली आहे की जर ग्राहकांना त्यांच्या घरी रोख रक्कम मिळवायची असेल तर त्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. परंतु, जर तुम्ही डोअर स्टेप सेवा वापरत असाल, तर बँक तुमच्याकडून निश्चितपणे त्यासाठी सेवा शुल्क आकारेल.

तुम्ही आधार ATM कसे वापरू शकता?

  • यासाठी तुम्हाला IPPB च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डोअर स्टेप बँकिंगचा पर्याय निवडावा लागेल.

  • येथे तुम्ही तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता, पिन कोड, तुमच्या घराजवळील सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस आणि तुमचे खाते असलेल्या बँकेचे नाव टाका.

  • यानंतर तुम्हाला I Agree या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर काही वेळातच पोस्टमन तुमच्या घरी रोख रक्कम घेऊन येईल.

  • NPCI ने AePS द्वारे 10,000 रुपयांपर्यंत रोख व्यवहाराची मर्यादा सेट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT