Wheat Production  sakal
Personal Finance

Wheat Production : गहू होणार स्वस्त, तर तूरडाळ महाग ; तुरीला अवकाळीचा फटका

देशात यंदा गव्हाच्या पेरणीत वाढ झालेली आहे. सोबतच अनुकूल हवामानामुळे यावर्षी देशात विक्रमी ११.५ कोटी टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते. ते आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन ठरू शकते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशात यंदा गव्हाच्या पेरणीत वाढ झालेली आहे. सोबतच अनुकूल हवामानामुळे यावर्षी देशात विक्रमी ११.५ कोटी टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते. ते आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन ठरू शकते. पावसाने हजेरी न लावल्यास गव्हाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे तुरीला फटका बसल्याने उत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे तूर डाळीच्या दरात सतत वाढ होत असून ते नवा उच्चांक गाठू शकतात. तूर डाळ प्रति किलो २०० रुपयांच्या पार जाण्याचे संकेत आहेत.

रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी पेरणी झाली. पीक वर्ष २०२२-२३ (जुलै ते जून) मध्ये गव्हाचे उत्पादन सुमारे ११ कोटी टन होते. तर मागील वर्षी १०.७७ कोटी टन उत्पादन झाले. हवामान अनुकूल असल्यास यंदा गव्हाचे उत्पादन सुमारे ११.५ कोटी टन होईल, असा कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे. केंद्र सरकारने यावर्षी गव्हाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) २,२७५ रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे. यामुळे बहुतांश शेतकरी गहू विकतील, अशी अपेक्षा आहे.

पेरणी क्षेत्रात वाढ

मागील वर्षीच्या तुलनेत गहू पीक क्षेत्रातही वाढ झाली आहे. गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यंदा २,२७५ रुपये प्रतिक्विंटल दराने गव्हाची खरेदी होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन होणे, ही सरकारसाठी दिलासादायक बाब आहे.

कारण ‘एफसीआय’च्या साठ्यातून खुल्या बाजारात गहू वितरित केला जात होता. आतापर्यंत ५९ लाख टन गहू खुल्या बाजारात विकला गेला आहे. गव्हाचे दर प्रति किलो पाच रुपयांनी घसरणार असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सध्या ३४ रुपये किलो असलेला गहू २९ रुपये तर ४० रुपये असलेला गहू ३५ रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे.

विक्रमी उत्पादन होणार असल्याने गव्हाच्या किमतीत घट होणार आहे. अवकाळी पावसामुळे तुरीचे नुकसान झाल्याने मागील वर्षी ८० रुपये प्रति किलो असलेली तूर डाळ यंदा १६५ रुपये किलोवर गेली आहे.

- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष,

नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT