EPFO Interest Sakal
Personal Finance

EPFO Interest: PF खात्यात पैसे कधी येणार? EPFO ने दिली मोठी अपडेट

EPFO Interest: 2022-23 या आर्थिक वर्षात अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत.

राहुल शेळके

EPFO Interest: कोट्यवधी नोकरदारांच्या पगाराचा काही भाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत जमा केला जातो. ईपीएफओ या ठेवीवर निश्चित व्याज देते. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सरकारने 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात व्याजाचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. तुम्हीही या वर्षीच्या EPF च्या पैशाची वाट पाहत असाल तर EPFO ​​ने याबाबत माहिती दिली आहे.

व्याजाचे पैसे कधी मिळणार?

महत्त्वाचे म्हणजे, 2022-23 या आर्थिक वर्षात अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. अशा स्थितीत अनेक ग्राहकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, त्यांच्या खात्यात पैसे कधी येणार.

आता या प्रश्नाचे उत्तर देताना EPFO ​​ने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देताना असे सांगण्यात आले आहे की, बहुतांश खातेधारकांना आर्थिक वर्ष 2022 साठी व्याजदराचे पैसे मिळाले आहेत, तर काहींना त्यांच्या खात्यात पैसे मिळण्यासाठी अजून थोडा वेळ आहे.

ईपीएफओने सर्व सदस्यांना सांगितले की, मागील 3 वर्षांची थकबाकी व्याजाची रक्कम लवकरच ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाईल.

तुमची ईपीएफ शिल्लक कशी तपासायची-

  • पीएफ शिल्लक तपासण्यासाठी प्रथम उमंग अॅप डाउनलोड करा.

  • यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून स्वतःची नोंदणी करा.

  • यानंतर EPFO ​​च्या पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर View Passbook वर क्लिक करा.

  • पुढे तुम्ही तुमचा UAN टाका आणि नंतर Get OTP वर क्लिक करा.

  • यानंतर, तुम्हाला काही मिनिटांत EPF पासबुक आणि शिल्लक माहिती मिळेल.

उमंग अॅप व्यतिरिक्त, तुम्ही EPFO ​​वेबसाइटवर जाऊन EPFO ​​बॅलन्स देखील तपासू शकता. यासाठी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर सदस्य पासबुक या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही UAN आणि पासवर्ड टाका. यानंतर, काही मिनिटांत तुम्हाला या बद्दलची माहिती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT