Adani Group Sakal
Personal Finance

Adani Group: हिंडेनबर्गनंतर अदानींसाठी काळ बनलाय OCCRP रिपोर्ट! मालकाचे झालेत स्मृती इराणींशी वाद

Adani Group: OCCRP ने अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत.

राहुल शेळके

Adani Group: अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहावर आरोप केल्यानंतर आता OCCRP ने अदानी समूहाबाबत नवा खुलासा केला आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत.

अदानी समूहाने गुपचूप स्वत:चे शेअर्स खरेदी करून शेअर बाजारात लाखो डॉलर्स गुंतवल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यामध्ये अदानी समूहाने मॉरिशसमध्ये केलेल्या व्यवहारांचा तपशील उघड करण्यात आला आहे.

2013 ते 2018 या काळात समुहाच्या कंपन्यांनी गुपचूप त्यांचे शेअर्स खरेदी केल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. अदानी समूहाने एक निवेदन जारी करून अहवालांच्या आरोपांचे खंडन केले आहे.

OCCRP कोण आहे?

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) हे शोध पत्रकारांचे जागतिक नेटवर्क आहे. OCCRP ची स्थापना 2006 मध्ये झाली. OCCRB ला अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड यांसारख्या लोकांकडून निधी प्राप्त होतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉर्ज सोरोस हे मोदी सरकारचे कट्टर विरोधक मानले जातात. ते वेळोवेळी मोदी सरकारवर टीका करत असतात. जॉर्ज त्यांच्या संस्था, ओपन सोसायटी फाउंडेशनद्वारे OCCRP ला निधी पुरवतात. याशिवाय समूहाला फोर्ड फाऊंडेशन, रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि ओक फाऊंडेशनकडूनही निधी मिळतो.

OCCRP संघटित गुन्ह्यांवर आधारित अहवाल देण्यासाठी ओळखली जाते. हे मीडिया हाऊससह भागीदारीद्वारे लेख प्रकाशित करते. हा अहवाल जाहीर होण्यापूर्वीच भारतीय नियामक संस्था देशांतर्गत वित्तीय बाजारांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

जॉर्जचा वादांशी जुना संबंध

अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा दीर्घकाळ वादांशी संबंध आहे. ते यापूर्वीही पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधाने करत आहेत. केवळ पीएम मोदींवरच नाही तर त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही वादग्रस्त विधाने केली आहेत.

जॉर्ज सोरोस यांनी पीएम मोदींवर क्रोनी कॅपिटलिझमला  प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता. त्यांचे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. अदानी समूहाच्या कथित हेराफेरीत पंतप्रधान मोदींचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

त्यांच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या होत्या की, जॉर्ज सोरोस यांनी भारताच्या लोकशाहीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला असून पंतप्रधान मोदी हे त्यांचे लक्ष्य आहे. याआधीही आम्ही परदेशी शक्तींचा पराभव केला आहे. देशाविरुद्धचे कोणतेही षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT