Inflation  sakal
Personal Finance

Inflation : घाऊक महागाईचा एप्रिलमध्ये उच्चांक

अन्नधान्य आणि विशेषतः भाज्या महागल्याने एप्रिल महिन्यात घाऊक महागाईने १.२६ टक्के म्हणजेच १३ महिन्यांचा उच्चांकी स्तर गाठला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अन्नधान्य आणि विशेषतः भाज्या महागल्याने एप्रिल महिन्यात घाऊक महागाईने १.२६ टक्के म्हणजेच १३ महिन्यांचा उच्चांकी स्तर गाठला. गेल्या दोन महिन्यांपासून घाऊक किंमत निर्देशांक आधारित (डब्ल्यूपीआय) महागाई सातत्याने वाढत चालली आहे.

हे प्रमाण फेब्रुवारी महिन्यात ०.२० टक्के होते, तर मार्च महिन्यात ते ०.५३ टक्के होते. मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात हे प्रमाण ०.७९ टक्के होते. एप्रिलमध्ये वाढलेल्या महागाईचे प्रमाण हे १३ महिन्यातील उच्चांकी असून यापूर्वी मार्च २०२३ मध्ये १.४१ टक्के एवढी वाढ नोंदविण्यात आली होती.

एप्रिल महिन्यात अन्नधान्य, वीज, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, तयार अन्नपदार्थ व अन्य उत्पादने यांचे भाव वाढल्यामुळे महागाई वाढल्याचे व्यापार आणि उद्योग मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. .अन्नधान्याची महागाई ७.७४ टक्के झाली असून मार्च महिन्यात ती ६.८८ टक्के होती. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई १.३८ टक्के झाली, ती मार्च महिन्यात उणे ०.७७ टक्के होती.

दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने मात्र किरकोळ चलनवाढीत (रिटेल इन्फ्लेशन) घट होत असल्याचे म्हटले आहे. ‘आरबीआय’ने एप्रिलमध्ये ही चलनवाढ ४.८३ टक्के म्हणजे ११ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर असल्याचे दाखवून दिले.

महागाई आणखी वाढणार

गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलासह विविध वस्तूंचे दर वाढत असून, ही महागाई येत्या दोन महिन्यांत म्हणजे मे आणि जूनसाठी दोन टक्क्यांवरही जाऊ शकते, असा अंदाज ‘आयसीआरए’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायक यांनी वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फरसावाले बाबा कोण? मृत्यूमुळे शिष्य आणि भाविक आक्रमक, महामार्ग रोखला

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

SCROLL FOR NEXT