Rahul Gandhi On Anant Ambani-Radhika Merchant Wedding Sakal
Personal Finance

Rahul Gandhi: अनंत अंबानीच्या लग्नावर राहुल गांधींनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, अंबानी कुटुंबाचा पैसा...

Rahul Gandhi On Anant Ambani-Radhika Merchant Wedding: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा जुलैमध्ये विवाहबद्ध झाला. ज्याची केवळ भारत किंवा आशियामध्येच नव्हे तर जगभरात चर्चा झाली.मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नावर 5 हजार कोटी रुपये खर्च केले होते.

राहुल शेळके

Rahul Gandhi On Anant Ambani-Radhika Merchant Wedding: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा जुलैमध्ये विवाहबद्ध झाला. ज्याची केवळ भारत किंवा आशियामध्येच नव्हे तर जगभरात चर्चा झाली. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नावर 5 हजार कोटी रुपये खर्च केले होते.

आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभेच्या निवडणूक प्रचारसभेत यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, अंबानींनी त्यांच्या मुलाच्या लग्नावर हजारो कोटी रुपये खर्च केले. तो पैसा कोणाचा आहे?

शेतकरी कर्ज घेतल्यानंतरच लग्न करू शकतो

बहादूरगडच्या रॅलीत राहुल गांधींनी लोकांना विचारले की, तुम्ही अंबानींचे लग्न पाहिले आहे का? अंबानींनी लग्नावर करोडो खर्च केले. हा पैसा कोणाचा आहे? हा तुमचा पैसा आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नासाठी बँकेकडून कर्ज घेता.

पण सरकारने अशी रचना तयार केली आहे की, ज्यामुळे फक्त 25 लोकांच्या लग्नावर करोडो रुपये खर्च करता येतात, पण शेतकरी कर्जात बुडूनच आपल्या मुलांचे लग्न करू शकतो. हा संविधानावर हल्ला नाही तर काय आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नावर 5,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर हे लग्न जगातील सर्वात महागडे लग्न ठरले. 12 जुलै 2024 रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या या लग्नाला जगभरातील सेलिब्रिटी, राजकारणी आणि व्यावसायिक नेते उपस्थित होते.

मात्र या लग्नाच्या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एनसी फायनान्शियल ॲडव्हायझरी सर्व्हिसेसचे संस्थापक नितीन चौधरी यांच्या विश्लेषणानुसार अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे एकूण बजेट मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीच्या फक्त 0.5 टक्के इतके होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT