why engineers line up for cycle test to become peons in kerala  Sakal
Personal Finance

Engineer Student: भारतातील सर्वात सुशिक्षित राज्यातील इंजिनियर तरुणांना का व्हायचंय शिपाई?

Engineer Student: B.Tech ची पदवी घेतलेल्या तरुणांना शिपायाची नोकरी का करावीशी वाटते?

राहुल शेळके

Engineer Student: भारतात शिक्षण आणि पात्रतेनुसार कामाची विभागणी केली जाते. उच्च शिक्षण घेतलेले उच्च पदासाठी काम शोधत असतात आणि ज्यांची पात्रता कमी आहे ते लहान पदांसाठी काम शोधत असतात . पण भारतातील सर्वात सुशिक्षित राज्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे.

केरळमधील एर्नाकुलममध्ये शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने लोक सरकारी कार्यालयात शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले.

आश्‍चर्याची बाब म्हणजे त्यापैकी बहुतांश बी.टेक पदवीधर होते. या नोकरीसाठी सुमारे 23,000 रुपये पगार दिला जात आहे. शिपाई पदासाठी सातवी उत्तीर्ण असण्या सोबतच सायकल चालवण्याची क्षमता तपासली जात होती.

शिपायाच्या नोकरीसाठी सायकल चालवणे अनिवार्य आहे. यासाठी अनेक इंजिनियर आणि पदवीधर पदवीधारकही नोकरीसाठी सायकल चाचणी देण्यासाठी आले होते. यातील एका इंजिनियरने सांगितले की, ड्रायव्हिंग किंवा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मशी संबंधित कोणत्याही कामापेक्षा हे सुरक्षित आहे. यात नोकरी गमावण्याचा धोका नाही.

B.Tech ची पदवी घेतलेल्या तरुणांना शिपायाची नोकरी का करावीशी वाटते?

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, सायकल हे आता वाहतुकीचे साधन राहिलेले नाही पण सरकारी पदासाठीचे नियम अजूनही बदललेले नाहीत. सुमारे 101 उमेदवार ‘सायकल चाचणी’ उत्तीर्ण झाले.

ही त्यांच्या सहनशक्तीची कसोटी आहे असे समजले जाते आणि त्यांना ‘रँकिंग लिस्ट’साठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. केरळमध्ये या शिपाई नोकरीसाठी अर्जदाराला सातवी उत्तीर्ण असणे आणि सायकल कशी चालवायची हे माहित असणे आवश्यक आहे.

शिपायाचा पगार किती असेल?

केरळमध्ये एका शिपायाचा मूळ पगार सुमारे 23,000 रुपये प्रति महिना आहे. सायकलिंग परीक्षेला बसलेल्या अनेक B.Tech पदवीधारकांना असे वाटते की सरकारी कार्यालयातील छोटीशी नोकरी कमी जोखमीची आणि अधिक सुरक्षित असते.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा किंवा मोठ्या टेक कंपन्यांमध्ये सुमारे 11,000 रुपये प्रति महिना काम करण्यापेक्षा हे खूप चांगले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना, बँकिंगमध्ये डिप्लोमा असलेला कोचीचा रहिवासी प्रशांत म्हणाला की, मी कॅफे चालवतो जर आमची KSEB (राज्य वीज कंपनी) मध्ये नियुक्ती झाली, तर पगार 30,000 रुपयांपेक्षा जास्त असेल.'

तो पुढे म्हणाला की, 'गेल्या काही वर्षांपासून तो चांगल्या उत्पन्नासह सुरक्षित नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.' सायकलिंग चाचणीचा कोणताही व्यावहारिक हेतू नसला तरी, राज्य लोकसेवा आयोग KSEB आणि KSFE (केरळ राज्य) सायकलिंग चाचण्यांसाठी आग्रह धरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT