Will the Israel-Palestine war increase or decrease the price of gold? What the experts say  Sakal
Personal Finance

Gold Rate: इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धामुळे सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय सांगतात तज्ञ

Gold Rate Today: गेल्या आठवडाभरापासून इस्राईलवर झालेल्या हल्ल्याचा परिणाम सोन्या-चांदींच्या किंमतीवर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Gold Rate Today: गेल्या आठवडाभरापासून इस्राईलवर झालेल्या हल्ल्याचा परिणाम सोन्या-चांदींच्या किंमतीवर झाला आहे. यामुळे आठवड्यातच सोन्याची किंमत ३ हजारांनी वाढली आहे. सध्या सोने ६० हजार रुपये प्रति तोळ्याने विक्री होत आहे.

नवरात्रोत्सवासह दसरा-दिवाळीला सोने खरेदी शुभ मानली जाते. यामुळे सोने खरेदीसाठी इच्छुक नागरिकांकडून भाव कधी कमी होणार, याची विचारणा सराफांकडे करण्यात येत आहे.

गाझा पट्टीवर हुकूमत गाजविणाऱ्या ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने सात ऑक्टोबररोजी इस्राईलवर हल्ला केला होता. या युद्धामुळे आंतररराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. यात प्रामुख्याने सोन्या-चांदीच्या भावांचा भडका उडाला.

गेल्या आठवडाभरापूर्वी ५७ हजार रुपये प्रतितोळे विक्री होणारे सोने सध्या ६० हजार रुपयांनी विक्री होत आहे. दसरा-दिवाळी तोंडावर असताना सोने-चांदीचे दर कमी होतील असे वाटले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील हल्ल्याच्या घडामोडींमुळे किंमती वाढल्या.

त्यात पुन्हा ५०० ते हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. चांदी ७२ ते ७३ हजार रुपये किलोने विक्री होत आहे. आता सध्या सोने खरेदी करणाऱ्यांकडून दर कमी होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

इस्राईलवर झालेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार झाला आहे. या कारणामुळे सोन्याच्या किंमतीत ३ हजारांनी वाढ झाली आहे. दसरा-दिवाळीत सोने ५५ हजारांपर्यंत येईल, असे वाटले होते.

मात्र, सद्यःपरिस्थिती बघता यात आणखी वाढ होणार आहे. यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. तर अनेकजण भाव कधी कमी होणार याचीच विचारणा करीत आहेत.

- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष सराफा असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT