India GDP Sakal
Personal Finance

India GDP: अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष होताच भारताला मोठा धक्का; विकास दरात...

अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर जागतिक विकास दराबाबत एक अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

राहुल शेळके

World Bank Estimate For India GDP: भारतीय वंशाचे अजय बंगा यांनी जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून कार्यकाळ सुरू केला आहे. ते या पदावर पाच वर्षे काम करतील. ते जागतिक बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर जागतिक विकास दराबाबत एक अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

अहवालात या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकास दरात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उच्च व्याजदराचे परिणाम, रशिया-युक्रेन युद्धाचे दुष्परिणाम आणि कोविड-19 महामारीचे परिणाम अर्थव्यवस्थेवर कायम असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी भारताचा आर्थिक विकास दर (GDP) 6.3 टक्के इतका कमी केला आहे. जागतिक बँकेने जानेवारीत केलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा हे प्रमाण 0.3 टक्के कमी आहे. (World Bank cuts India's GDP growth forecast for FY24 to 6.3% in latest Global Economic Prospects report)

जागतिक अर्थव्यवस्थेसाठीचा अंदाज:

जागतिक बँकेने ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्सच्या ताज्या अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे की 2023 मध्ये जागतिक विकास दर 2.1 टक्क्यांपर्यंत खाली येईल.

2022 मध्ये विकास दर 3.1 टक्के होता. चीन व्यतिरिक्त उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्था (EMDEs) मधील वाढीचा दर गेल्या वर्षीच्या 4.1 टक्क्यांवरून यावर्षी 2.9 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. यामुळे विकासदरात मोठी घसरण दिसून येते.

काय म्हणाले जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा:

नवनियुक्त जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा म्हणाले, "गरिबी कमी करण्याचा आणि समृद्धीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे रोजगार. विकास मंदावला म्हणजे रोजगार निर्मितीही कमी होईल."

भारतीय वंशाच्या बंगा यांनी शुक्रवारी जागतिक बँकेचे अध्यक्षपद स्वीकारले. जागतिक बँकेच्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील मंद विकास दराचे कारण महागाई दरात वाढ आणि कर्जाच्या वाढत्या खर्चामुळे खाजगी उपभोगावर परिणाम होत आहे.

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील:

जागतिक बँकेने म्हटले आहे की, 2023 च्या सुरुवातीला भारतातील वाढ ही महामारीपूर्व दशकात गाठलेल्या पातळीपेक्षा कमी असेल.

कारण किंमती वाढ आणि कर्जाच्या वाढत्या खर्चामुळे खाजगी गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. तरीही उदयोन्मुख प्रमुख विकसनशील अर्थव्यवस्थांपैकी (EMDEs), भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. (World Bank cuts India's GDP growth rate)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT