world rank holder investor charlie munger dies right hand of warren buffett sakal
Personal Finance

गुंतवणूक विश्वातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व चार्ली मंगर

महान गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट यांचे भागीदार, उजवा हात, बर्कशायर हॅथवे कंपनीचे उपाध्यक्ष चार्ली मंगर यांचे नुकतेच त्यांच्या वयाच्या ९९ व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले.

सकाळ वृत्तसेवा

महान गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट यांचे भागीदार, उजवा हात, बर्कशायर हॅथवे कंपनीचे उपाध्यक्ष चार्ली मंगर यांचे नुकतेच त्यांच्या वयाच्या ९९ व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. चार्ली मंगर हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. त्यांची गुंतवणूक शैली अत्यंत आगळीवेगळी होती. तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेल्या मंगर यांचा स्वभाव मिश्किल होता.

त्यांच्या मिश्‍कील, मार्मिक टिप्पण्यांमुळे ते संपूर्ण गुंतवणूक विश्वातील एक हवेहवेसे वाटणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. त्यांच्या गुंतवणुकीबाबतच्या निर्णयाला वॉरने बफेही आव्हान देत नसत. प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या या गुंतवणूक गुरुने दिलेले दहा मोलाचे ‘गुंतवणूक मंत्र’ सर्वांसाठी उपयुक्त आहेत.

१ भरपूर पैसे, हे सततच्या ‘खरेदी-विक्री’मधून नाही, तर ‘थांबण्यातून’ मिळविता येतात. याचाच अर्थ ट्रेडर नको, तर गुंतवणूकदार बना. ट्रेडर हे वारंवार खरेदी आणि विक्री करतात. परंतु, गुंतवणूकदार खरेदी करून शांतपणे थांबतात आणि मोठे पैसे कमावतात. याबाबतीत एनटीपीसी, टिटाघर वॅगन, मारुतीपासून ते सुझलॉनपर्यंत अशा अनेक शेअरची उदाहरणे देता येतील. कोविड काळामध्ये घाबरून विक्री न करता जे थांबले त्यांनी भरपूर कमाई केली.

२ अतिशय बुद्धिमान माणसे अनेकदा वाईट गुंतवणूकदार असतात. गुंतवणूक करण्यासाठी नुसते हुशार असून चालत नाही. तुमचा स्वभाव उथळ असेल, तर तुमची गुंतवणूक फसू शकते.

३ दर दिवशी थोडे अधिक शहाणे; थोडे अधिक सुधारण्याकडे लक्ष द्या. ज्ञान मिळविणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ‘आता माझे सर्व काही शिकून झाले’, ‘आता मला शेअर बाजारामधील सर्व काही समजते’, असे मानणे चुकीचे असून, प्रत्येक दिवस हा काही ना काही शिकविणारा ठरतो

४ मूल्यात्मक गुंतवणूक; सुज्ञ गुंतवणूक व्यवसायाची खरी किंमत काय आहे ते जोखणे महत्त्वाचे. व्यवसाय खूप चांगला असेल, त्याची क्षमता मोठी असेल आणि त्याप्रमाणात शेअरची किंमत कमी वाटली, तर असा शेअर घेणे योग्य ठरेल. अनेक स्मॉल कॅप शेअर मिड कॅप आणि लार्ज कॅप झालेले दिसतात. हा सिद्धांत मूल्यात्मक (व्हॅल्यू) गुंतवणुकीचे महत्व सांगतो.

५ अनावश्‍यक खर्च टाळा व गुंतवणूक करा ‘प्राप्ती - गुंतवणूक = खर्च’ हा नियम पाळणे अत्यंत आवश्‍यक आहे. चार्ली यांच्याकडे प्रचंड पैसे आल्यानंतरसुद्धा ते त्यांच्या जुन्याच घरात कित्येक वर्षे राहिले.

६ अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करा, की जे लवचिक आणि टिकाऊ आहेत. काळानुसार बदल करणाऱ्या आणि टिकून राहू शकणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे नेहमीचा योग्य ठरते. कोडॅक, नोकिया, ब्लॅकबेरी, याहू, झेरॉक्स, हिताची अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी काळानुसार उत्पादनामध्ये बदल केले नाहीत आणि ते नामशेष झाले.

७ खात्री असेल तेव्हाच मोठी गुंतवणूक तुम्हाला तुमची निवड आणि निर्णय अतिशय योग्य आहे, हे समजते तेव्हा तुम्ही त्यावर खूप मोठी पैज लावणे योग्य ठरते. उदा. तुम्हाला तुम्ही निवडलेला एखादा शेअर अतिशय चांगला आहे याची खात्री असते, तेव्हाच तुम्ही त्यामध्ये मोठी गुंतवणूक करणे योग्य ठरते.

८ ताळेबंदासह इतर बाबीही तपासा तुम्ही ‘एबीटडा’ हा शब्द ऐकाल तेव्हा सावध व्हा ! असे चार्ली म्हणत. याचा अर्थ ताळेबंद आणि जमाखर्च याला फार महत्त्व न देता इतर बाबीसुद्धा तपासून पाहा.

९ साधेपणा महत्त्वाचा गुंतवणुकीत (तसेच एकूण आयुष्यात) साधेपणा महत्त्वाचा आहे. आपण नक्की कोठे चाललो आहोत, याची जाणीव त्यामुळे होते. गुंतवणुकीचे महत्त्व कळते व ती अंमलात आणता येते.

१० उतारवयासाठी योग्य निवड आवश्‍यक अर्थात, वृद्धापकाळ आनंदी होण्यासाठी आधीच्या आयुष्यात चांगली निवड करा; मग ती गुंतवणूक पैशांमधील असो किंवा माणसांमधील किंवा पुस्तकांमधील.

(लेखक ‘ए३एस फायनान्शिअल सोल्युशन्स’चे प्रवर्तक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT