Inflation  sakal
Personal Finance

WPI Inflation: महागाईपासून मोठा दिलासा, घाऊक महागाईचा दर 8 वर्षांच्या नीचांकी पातळीवर

मागील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात घाऊक महागाई दर -3.8 टक्के होता.

राहुल शेळके

WPI Inflation: जूनमध्ये घाऊक किंमत निर्देशांकात मोठा दिलासा मिळाला असून तो 8 वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. घाऊक महागाईचा दर जूनमध्ये -4.12 टक्क्यांवर आला आहे. मागील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात घाऊक महागाई दर -3.8 टक्के होता.

हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा घाऊक महागाईचा दर नकारात्मक पातळीवर आला आहे. 8 वर्षांच्या नीचांकी स्तरावर गेल्यानंतर महागाईपासून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिसू शकतो.

महागाई दर का कमी झाला?

वाणिज्य मंत्रालयाच्या या आकडेवारीत कोणत्या वस्तूंच्या महागाई दरात घट झाली हे सांगण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने खनिज तेल, खाद्यपदार्थ, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूच्या किंमती घसरल्या आहेत. याशिवाय कापडाच्या किंमतीही घसरल्या आहेत, त्याचा परिणाम महागाई दरात घट झाल्याचे दिसून येत आहे.

देशात खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही खाली आला असून जूनमध्ये तो 1.24 टक्क्यांवर आला आहे, जो मे महिन्यात 1.59 टक्के होता. इंधन आणि उर्जा विभागाच्या महागाई दरातही घट झाली आहे, जूनमध्ये हा दर -12.63 टक्क्यांवर आला आहे.

घाऊक महागाई सलग तिसऱ्या महिन्यात खाली

हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई शून्याच्या खाली आहे. एप्रिलमध्ये हा दर -0.92 टक्के होता आणि मेमध्ये हा दर -3.8 टक्क्यांवर आला आहे. तर घाऊक महागाईचा दर जूनमध्ये -4.12 टक्क्यांवर आला आहे.

जूनमध्ये पेट्रोल-डिझेल आणि इंधन आणि विजेच्या महागाई दरात 12.63 टक्के घट झाली आहे. जूनमध्ये उत्पादनांची महागाई 2.71 टक्क्यांवर आली आहे. इंधन उर्जा, एलपीजी, पेट्रोल आणि एचएसडी महागाई अनुक्रमे 22.29 टक्के, 16.32 टक्के आणि 18.59 टक्क्यांनी घसरली. क्रूड पेट्रोलियम महागाई दर जूनमध्ये वार्षिक 32.68 टक्क्यांनी घसरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT