Narayana Murthy Sakal
Personal Finance

Narayana Murthy: आठवड्यातून 70 तास काम करण्याचा नारायण मूर्तींचा सल्ला! सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा राडा

Narayana Murthy: भारताची उत्पादकता जगात कमी असल्याचं नारायण मूर्ती म्हणाले.

राहुल शेळके

Narayana Murthy: इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती म्हणाले की, भारतातील तरुणांना जास्त तास काम करण्याची गरज आहे. मूर्ती म्हणाले की, 'आमच्या तरुणांनी पाश्चात्य देशांकडून वाईट सवयी शिकल्या आहेत आणि त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे'. टीव्ही मोहनदास पै यांच्या पॉडकास्ट 'द रेकॉर्ड'मध्ये त्यांनी या गोष्टी सांगितल्या.

एनआर नारायण मूर्ती म्हणाले की, 'कामाच्या उत्पादकतेच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांपैकी एक आहे. जोपर्यंत आपण आपली कामाची उत्पादकता वाढवत नाही, सरकारमधील भ्रष्टाचार कमी करत नाही, नोकरशाहीतील निर्णयांना होणारा विलंब कमी करत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्या देशांशी स्पर्धा करू शकत नाही.

ते पुढे म्हणाले की, 'म्हणून माझे आवाहन आहे की, तरुणांनी हा माझा देश आहे, असे म्हणावे. आठवड्यातून 70 तास काम करावे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमध्ये लोकांनी हेच केले. तेथील प्रत्येक नागरिकाने काही वर्षे अतिरिक्त तास काम केले.

तरुणच देश घडवू शकतात

नारायण मूर्ती म्हणाले की, 'प्रत्येक सरकार तितकेच चांगले असते जेवढी लोकांची संस्कृती असते. खूप कष्टाळू लोकांसाठी आपल्याला आपली संस्कृती बदलावी लागेल आणि हा बदल तरुणांकडूनच होईल. भारताच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तरुणच आपला देश घडवू शकतात.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नारायण मूर्ती यांच्या 70 तास काम करण्याच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर युजर्समध्ये वाद सुरू झाला आहे. एका युजरने कमेंट केली, 'आठवड्यातील 70 तास काम करण्याबद्दल पूर्णपणे असहमत! 70 तास काम केल्यानंतर आम्ही सर्वोत्तम देश होऊ, पण कोणत्या किंमतीवर?

आठवड्यातून 70 तास काम केल्यानंतर ती व्यक्ती काय साध्य करेल? चांगले आरोग्य? छान कुटुंब? चांगला साथीदार? आनंद? जर ती व्यक्ती आठवड्यातून 70 तास काम करून यश मिळवण्याचे ध्येय ठेवत असेल, तर त्या व्यक्तीने यशाची व्याख्या कशी करावी असे मला वाटते?'

Youth Should Work 70 Hours a Week Narayana Murthy's Statement Gets Slammed on Social Media

आणखी एका यूजरने लिहिले की, 'फ्रेशर्सना इन्फोसिसकडून 3.5 लाख रुपये पगार दिला जातो, त्यांना आठवड्यातून 70 तास काम करावे लागते. भांडवलदार कर्मचाऱ्यांना नफा कमावणारी यंत्रे म्हणून पाहतात. कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक स्थिती त्यांना महत्त्वाची वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT