Zee-Sony Merger sakal
Personal Finance

Zee-Sony Merger : विलीनीकरण व्यवहाराबाबत ‘झी-सोनी’ची पुन्हा चर्चा सुरू

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस आणि सोनी समूह आता पुन्हा १० अब्ज डॉलरचा विलीनीकरण व्यवहार वाचवण्यासाठी चर्चा करत आहेत. ‘सोनी’ने २२ जानेवारी रोजी हा व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस आणि सोनी समूह आता पुन्हा १० अब्ज डॉलरचा विलीनीकरण व्यवहार वाचवण्यासाठी चर्चा करत आहेत. ‘सोनी’ने २२ जानेवारी रोजी हा व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले होते. दोन्ही कंपन्यांनी गेल्या १५ दिवसांत अनेक बैठका घेतल्या असून, मतभेद सोडवणे आणि करार पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

‘झी’चे एमडी आणि सीईओ पुनित गोयंका यांनी विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या नव्या कंपनीचे नेतृत्व करणार नाही, अशी ‘सोनी’ची मागणी मान्य केल्याचे याबाबतच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गोयंका हे नव्या कंपनीसाठी सल्लागार ठरू शकतात, असे ‘सोनी’ने म्हटले आहे. अद्याप दोन्ही कंपन्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या बातमीनंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये चांगली वाढ झाली.

सोनी समूह भारतात व्यवसाय वाढविण्यात अपयशी ठरल्याने तिच्यावर कर्जाचा बोजा वाढला, तर झी एंटरटेनमेंटवरही कर्जाचे ओझे असल्याने या दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. विलीनीकरणानंतर १० अब्ज डॉलर अर्थात सुमारे ८३ हजार कोटी रुपये मूल्याची कंपनी तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT