Sridhar Vembu Toxic Work Culture Sakal
Personal Finance

Zoho CEO: ...अन्यथा कंपन्या टिकणार नाहीत; टॉक्सिक वर्क कल्चरबद्दल काय म्हणाले जोहोचे सीईओ?

Sridhar Vembu On Toxic Work Culture: भारतीय कंपन्यांना त्यांच्या वर्क कल्चरच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अर्न्स्ट अँड यंग इंडिया कंपनीच्या(EY India) CA, 26 वर्षीय अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिल यांच्या मृत्यूनंतर कामाच्या दबावामुळे भारतीय कंपन्यांवर त्यांच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

राहुल शेळके

Sridhar Vembu On Toxic Work Culture: भारतीय कंपन्यांना त्यांच्या वर्क कल्चरच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अर्न्स्ट अँड यंग इंडिया कंपनीच्या(EY India) CA, 26 वर्षीय अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिल यांच्या मृत्यूनंतर कामाच्या दबावामुळे भारतीय कंपन्यांवर त्यांच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे.

नुकत्याच झालेल्या बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर या आरोपांना आणखी वेग आला आहे. आता झोहोचे सीईओ श्रीधर वेंबू यांनी म्हटले आहे की, ज्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रेशर कुकरमध्ये बसवतात आणि त्यांना काम करायला लावतात त्या दीर्घकाळात टिकणार नाहीत.

'माझ्या कोणत्याही कर्मचाऱ्याने दबावाखाली काम करावे असे मला वाटत नाही'

श्रीधर वेंबू म्हणाले की, कार्यालयातील वातावरण अनेक गोष्टींमुळे बिघडते. यासाठी केवळ कामाचे तास जबाबदार नाहीत. लोक आपल्या कुटुंबापासून दूर कामानिमित्त येतात. कार्यालयात पोहोचण्यासाठी त्यांना तासनतास वाया घालवावे लागतात.

ते एकटे पडतात. जर आम्हाला आमच्या कंपनीचे भविष्य चांगले करायचे असेल तर आम्हाला चांगले कामाचे वातावरण तयार करावे लागेल. श्रीधर वेंबू म्हणाले की, मी सुमारे 28 वर्षे काम करत आहे आणि मला आणखीन काम करायचे आहे. पण, यासाठी मी माझ्या शरीराशी खेळू शकत नाही. माझ्या कोणत्याही कर्मचाऱ्याने हे करू नये असे मला वाटते.

अ‍ॅना सेबॅस्टियनच्या मृत्यूमुळे वादाला सुरुवात

ॲना सेबॅस्टियनच्या मृत्यूपासून कामाच्या दबावाबाबतची चर्चा सुरू झाली आहे. ॲनाची आई अनिता ऑगस्टिन यांनी ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना ईमेल लिहून अधिक कामाचे तास थांबवण्याचे आवाहन केले होते.

ईवाय इंडिया आणि राजीव मेमाणी यांनीही याप्रकरणी माफी मागितली आहे. यापुढेही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. केंद्र सरकारनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

दरम्यान, उत्तर प्रदेशातील झाशी येथे बजाज फायनान्समध्ये काम करणाऱ्या तरुण सक्सेना यांच्या आत्महत्येची बातमीही आली असून, कामाच्या त्रासामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. जर आपण ईएमआय वसूल करू शकलो नाही तर तो आमच्या पगारातून कापला जातो, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

बजाज फायनान्सने याबद्दल दु:ख व्यक्त केले असून कुटुंबासोबत उभे असल्याचे म्हटले आहे. याशिवाय असे विषारी वर्क कल्चर निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. असेही कंपनीने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT