PF withdrawal will be available through the BHIM App
esakal
PF Withdrawal Using BHIM App : देशभरातील ‘पीएफ’ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता त्यांना त्यांचा ‘पीएफ’ काढण्यासाठी प्रदीर्घ अन् किचकट प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकता नसेल. कारण, ईपीएफओ एक अशी प्रणाली आणत आहे, जी यूपीआयद्वारे पेमेंट करण्याइतकीच पीएफ काढणे सोपे करेल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) पुढील दोन ते तीन महिन्यांत यूपीआय-आधारित पीएफ काढण्याची प्रणाली सुरू करण्याची तयारी करत आहे. यासाठी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने एक संपूर्ण तांत्रिक चौकट विकसित केली जात आहे. या नवीन प्रणालीअंतर्गत, पीएफ खातेधारक कोणत्याही यूपीआय अॅपवरून थेट पैसे काढण्याच्या रिक्वेस्ट सबमिट करू शकतील.
रिक्वेस्ट सबमिट होताच, ईपीएफओ सिस्टम बॅकएंडमधील आधार क्रमांक, बँक खाते आणि पीएफ खात्याची माहिती ऑटोमॅटिक पडताळेल. जर सर्व तपशील बरोबर असल्याचे आढळले तर, दाव्याची प्रक्रिया त्वरित पुढे जाईल. यामुळे केवळ वेळ वाचणार नाही तर फॉलोअप घेणे देखील खूप सोपे होईल.
प्राप्त माहितीनुसार, भीम अॅपवर पहिल्या टप्प्यात ही सुविधा सुरू केली जाऊ शकते. सुरुवातीला पूर्ण पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. परंतु एक निश्चित मर्यादा निश्चित केली जाईल. रिझर्व्ह बँकेच्या यूपीआय नियमांना लक्षात घेऊन ही मर्यादा निश्चित केली जाऊ शकते.
याशिवाय जर ही नवीन प्रणाली सुरळीतपणे काम करू लागली आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरवपार झाला नाही, तर भविष्यात फोन पे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या प्रमुख यूपीआय प्लॅटफॉर्मवर देखील ही सुविधा सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.