Share Market Holidays Esakal
Sakal Money

Share Market Holidays: येत्या आठवड्यात शेअर बाजाराचे कामकाज फक्त तीन दिवस, जाणून घ्या कधी-कधी आहेत सुट्ट्या

Share Market Closed: दिवाळी (लक्ष्मीपूजन) शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे एक्सचेंजेसद्वारे मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केले जाईल.

सकाळ डिजिटल टीम

देशात सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. अशात आता होळीमुळे सोमवार, 25 मार्च रोजी भारतीय शेअर बाजार व्यवहारासाठी बंद राहणार आहे.

सोमवारी होळीची तर शुक्रवारी म्हणजेच 29 मार्च रोजी गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने येत्या आठवड्यात शेअर बाजर केवळ तीन दिवस सुरू राहिल.

सोमवारी, देशातील सर्वात मोठा बिगर कृषी कमोडिटी बाजार, मल्टि कमोडिटी एक्सचेंज (MCX) सकाळच्या सत्रात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद राहील. मात्र, सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत ते पुन्हा सुरू होईल.

या दिवशी ॲग्रो कमोडिटी इंडेक्समध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. याशिवाय शुक्रवारी एमसीएक्स आणि एनसीडीईएक्स या दोन्ही ठिकाणी व्यवहार बंद राहणार आहेत.

2024 मध्ये 14 सुट्ट्या

BSE हॉलिडे कॅलेंडरनुसार, 2024 मध्ये भारतीय शेअर बाजारला तब्बल 14 सुट्ट्या आहेत. यापूर्वी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि ८ मार्चला शिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद होता.

शेअर बाजार एप्रिलमध्ये दोनदा, मे, जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी एकदा आणि नोव्हेंबरमध्ये दोनदा बंद असणार आहे.

दिवाळी (लक्ष्मीपूजन) शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे एक्सचेंजेसद्वारे मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केले जाईल. या मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळा, नंतर कळवल्या जाणार आहेत.

2024 च्या शेअर बाजाराच्या सुट्टीच्या वेळापत्रकानुसार, गुड फ्रायडे ही मार्चची शेवटची सुट्टी आहे. एप्रिल 2024 मध्ये शेअर बाजारात 11 एप्रिल आणि 17 एप्रिलला दोन सुट्ट्या असतील.

11 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार ईद-उल-फित्र (रमजान ईद) साठी बंद राहणार आहे. तर राम नवमी सणानिमित्त 17 एप्रिल रोजी NSE आणि BSE बंद राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT