Tata Motors sakal
Share Market

Tata Motors : टाटा मोटर्सच्या नफ्यात २२२ टक्के वाढ ; प्रतिशेअर सहा रुपये अंतिम लाभांश जाहीर

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या तिमाहीत १७,४०७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या ५,४०७ कोटी रुपयांच्या तुलनेत नफ्यात तब्बल २२२ टक्के वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या तिमाहीत १७,४०७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या ५,४०७ कोटी रुपयांच्या तुलनेत नफ्यात तब्बल २२२ टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीतील ११,६६६ कोटी रुपयांच्या तुलनेत नफ्यातील वाढ ४९ टक्के आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिशेअर सहा रुपये अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे.

कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल १.१९ लाख कोटी रुपये असून, मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत तो १.०५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात १३.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीची उपकंपनी, जग्वार लँडरोव्हरने (जेएलआर) आर्थिक वर्षात आर्थिक कामगिरीचा चढता आलेख कायम ठेवला असून, मार्च तिमाहीमध्ये आणखी एक विक्रमी तिमाही नोंदवली आहे. तिमाहीत ‘जेएलआर’चा महसूल ७.९ अब्ज ब्रिटिश पाउंड होता, जो आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या मार्च तिमाहीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढला आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जेएलआरचा महसूल २९ अब्ज ब्रिटिश पाउंडवर पोहोचला, असून, त्याच्या पूर्ण वर्षातील सर्वोच्च महसूल आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात २७ टक्के वाढ झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी, टाटा मोटर्सचा निव्वळ नफा ३७,७६४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ४७९ कोटी रुपयांवरून लक्षणीयरित्या वाढला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलातही प्रभावी वाढ दिसून आली आहे. कंपनीने या वर्षात ४.३५ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून, मागील वर्षात तो ३.४३ लाख कोटी रुपये होता.

टाटा मोटर्स समूहाने आपला आतापर्यंतचा सर्वोच्च महसूल, नफा नोंदवला आहे. कंपनीचा भारतातील व्यवसाय आता कर्जमुक्त झाला आहे. येत्या काही वर्षांत ही मजबूत कामगिरी कायम ठेवण्याचा आम्हाला विश्वास आहे.

- पी. बी. बालाजी,

कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Midterm Loss : इराण युद्ध ट्रम्प यांना भोवले; मध्यावधी निवडणुकीतील पराभवावर अखेर कबुली, पुन्हा हल्ल्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : 'तुम्ही दोन पावले पुढे या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल'; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

IND vs NZ, 1st ODI: विराटचं अर्धशतक, अर्शदीपच्या ४ विकेट्स, तरी अंशुल कंबोज कसा ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'? म्हणाला, एक वाईट सामना...

Marathi Film Industry: मातीशी पुन्हा जुळलेली ‘नाळ’

Adai Dosa Recipe: पीठ आंबवण्याची गरज नाही; झटपट बनवा प्रोटीनयुक्त 'अडई डोसा'! पौष्टिक आणि चवदार दाक्षिणात्य नाश्ता... 

SCROLL FOR NEXT