Share Investment sakal
Share Market

Share Investment : पॉवर मेक प्रोजेक्ट्सला तब्बल 396.25 कोटीची ऑर्डर, वर्षभरात 155% परतावा

सिव्हिल कन्स्ट्रक्शन सेक्टरमधील पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीला (Power Mech Projects) मोठी ऑर्डर मिळाली आहे. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर, कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की त्यांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 396.25 कोटीची ऑर्डर मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिव्हिल कन्स्ट्रक्शन सेक्टरमधील पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीला (Power Mech Projects) मोठी ऑर्डर मिळाली आहे. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर, कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की त्यांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 396.25 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे, ज्याने एका वर्षात शेअरहोल्डर्सना 155 टक्के मजबूत परतावा दिला आहे.

पॉवर मेक या मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपनीला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 396.25 कोटीची ऑर्डर मिळाल्याची माहिती बीएसई वेबसाइटवर उपलब्ध आहे. या अंतर्गत, छत्तीसगड राज्यातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधील दधापारा-सेलाहदागोरी आणि निपानिया-भाटापारा-हथबंद स्थानकांदरम्यान ईपीसी आधारावर इलेक्ट्रिफाइड चौथी रेल्वे बीजी लाइन तयार केली जाणार आहे. त्याची किंमत 396.25 कोटी आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत, पॉवर मेक प्रोजेक्ट्सचा एकत्रित निव्वळ नफा 22.5 टक्क्यांनी वाढून 62 कोटी झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत नफा 50.6 कोटी होता. वार्षिक आधारावर, कंपनीचे एकूण उत्पन्न 912 कोटीवरून 1,114.9 कोटी पर्यंत वाढले आहे. हैदराबादमधील पॉवर मेक प्रॉजेक्ट्स ही पॉवर आणि इंफ्राक्स्ट्रक्चर सेक्टरमध्ये विविध प्रकारच्या सेवा देणारी प्रमुख इंफ्रास्ट्रक्चर कंस्ट्रक्शन कंपन्यांपैकी एक आहे.

मल्टीबॅगर पॉवर मॅक प्रोजेक्ट्सच्या शेअर्सने त्यांच्या शेअरहोल्डर्सना मोठा नफा दिला आहे. एका वर्षात स्टॉकचा परतावा 155 टक्के आहे. तर 1 महिन्यात 6 टक्के, 3 महिन्यात 30 टक्के आणि 6 महिन्यात 32 टक्के वाढ झाली आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,544 रुपये आहे आणि नीचांक 2,006.25 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 8,232.96 कोटी आहे. 26 फेब्रुवारीला हा शेअर 5208.05 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT