Hindalco Industries sakal
Share Market

Stocks to Watch : 'हा' स्टॉक कमी काळात देईल दमदार परतावा, तुमच्याकडे आहे का ?

शेअर बाजारात तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही हिंदाल्को इंडस्ट्रीजवर (Hindalco Industries) लक्ष ठेवू शकता. या शेअरबाबत ब्रोकरेज कंपन्या सकारात्मक दिसत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शेअर बाजारात तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही हिंदाल्को इंडस्ट्रीजवर (Hindalco Industries) लक्ष ठेवू शकता. या शेअरबाबत ब्रोकरेज कंपन्या सकारात्मक दिसत आहेत. हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गुरुवारी सुमारे 1 टक्क्यांनी वाढ झाली असून हा शेअर 513.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 620.60 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 381 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1.15 लाख कोटी आहे. कंपनीने नुकतेच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या शेअर्सबाबत बुलिश आहेत. 13 फेब्रुवारी 2024 च्या त्यांच्या रिसर्च रिपोर्टमध्ये त्यांनी स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे आणि 597 रुपये टारगेट प्राइस ठेवली आहे. यानुसार गुंतवणूकदारांना सुमारे 16 टक्के नफा होण्याची शक्यता आहे.

आदित्य बिर्ला समूहाची कंपनी हिंदाल्को इंडस्ट्रीजचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट डिसेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर 71 टक्क्यांनी वाढला आहे. या कालावधीत कंपनीला 2,331 कोटीचा नफा झाला आहे. कंपनीचा कंसोलिडेटेड रेव्हेन्यू वार्षिक आधारावर 0.6 टक्क्यांनी घसरून 52,808 कोटीवर आल्याची माहिती कंपनीने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे. मजबूत व्हॉल्यूम ग्रोथ आणि मजबूत ऑपरेशन्समुळे, कॉपर बिझनेसने विक्रमी EBITDA नोंदवला, जो वार्षिक 20 टक्के जास्त असल्याचे हिंदाल्कोचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पै म्हणाले.

EBITDA मागील वर्षीच्या तिमाहीत 1,591 कोटींच्या तुलनेत 2,443 कोटी होता. हायर सेल्स वॉल्यूम आणि किमतींमुळे कॉपर बिझनेसमधील रेव्हेन्यू 16 टक्क्यांनी वाढून 11,954 कोटींवर पोहोचला, पण ॲल्युमिनियम अपस्ट्रीममधून मिळणारा रेव्हेन्यू 0.9 टक्क्यांनी घसरून 7,971 कोटींवर आला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT