Gautam Adani Sakal
Share Market

Gautam Adani: ...यामुळे गौतम अदानी Adani Wilmar मधील 44% टक्के हिस्सा विकण्याच्या तयारीत

Gautam Adani Adani Wilmar share: अदानी विल्मर ही भारतातील एक आघाडीची FMCG कंपनी आहे

राहुल शेळके

Gautam Adani Adani Wilmar share: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत पोहोचलेल्या गौतम अदानी यांनी अदानी विल्मरमधील आपला 44 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेस येत्या महिन्यात अदानी विल्मरमधील 44 टक्के हिस्सा विकू शकते.

यावेळी, अदानी एंटरप्रायझेस सध्याच्या शेअरच्या किंमतीनुसार त्यातील 44 टक्के हिस्सा विकून 2.7 अब्ज डॉलरचा निधी उभारण्याचा प्रयत्न करू शकतात.

अदानी विल्मार ही भारतातील एक आघाडीची FMCG कंपनी आहे जी फॉर्च्युन ब्रँड नावाने बाजारात खाद्यपदार्थ विकते. बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी विल्मरचे शेअर्स 3.21 टक्क्यांनी घसरले आणि 12.55 अंकांनी घसरून ₹ 380 वर व्यवहार करत होते.

सुमारे ₹49,000 कोटींचे मार्केट कॅप असलेल्या अदानी विल्मारने गेल्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांचे 4 टक्क्यांचे नुकसान केले आहे, तर गेल्या 1 महिन्यात शेअर 5 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

अदानी विल्मरचे शेअर्स 6 महिन्यांत 13.53 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या 1 वर्षात अदानी विल्मरच्या गुंतवणूकदारांना 43 टक्के तोटा सहन करावा लागला आहे.

अदानी एंटरप्रायझेस आपल्या मूळ व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी अदानी विल्मरमधील आपला हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. अदानी विल्मरच्या सध्याच्या शेअरच्या किंमतीनुसार, अदानी विल्मरमधील अदानी एंटरप्रायझेसच्या हिस्स्याचे मूल्य सुमारे डॉलर 270 कोटी आहे.

अदानी विल्मरने 2022 मध्ये IPO द्वारे ₹ 3600 कोटी जमा केले होते. या IPO अंतर्गत गुंतवणूकदारांना अदानी विल्मरचे शेअर्स ₹ 230 मध्ये मिळाले आणि अदानी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना ₹ 21 ची सूट मिळाली.

या वर्षी जानेवारीमध्ये, अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT