Adani Group Sakal
Share Market

Adani Group: अदानी ग्रुपवर आणखी एक रिपोर्ट अन् कंपन्यांचे 3 तासात 35 हजार कोटी पाण्यात

Adani Group: हिंडेनबर्गच्या अहवालानंतर आता नव्या अहवालाने अदानी समूहावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल शेळके

Adani Group: अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण हिंडेनबर्गच्या अहवालानंतर आता नव्या अहवालाने अदानी समूहावर प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला हिंडेनबर्गने अदानी समूहावर प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर कंपनीचे मोठे नुकसान झाले होते.

आता ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजेच जगातील आघाडीचे गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या OCCRP ने अदानी समूहाच्या गुंतवणुकीवर गंभीर आरोप केले आहेत. फर्मचा दावा आहे की अदानी कुटुंबाच्या भागीदारांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी 'ऑफ शोअर' म्हणजेच अपारदर्शक निधीचा वापर केला आहे.

 2013 ते 2018 या कालावधीत समूह कंपन्यांनी त्यांचे शेअर्स गुपचूप खरेदी केले. नॉन-प्रॉफिट मीडिया ऑर्गनायझेशन OCCRP ने मॉरिशस आणि अदानी ग्रुपच्या अंतर्गत ईमेलद्वारे हे व्यवहार झाले असल्याचा दावा केला आहे.

3 तासात 35,000 कोटींचे नुकसान

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजेच OCCRP ने केलेल्या आरोपांनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी समूहाने आरोपांचे खंडन करूनही शेअर्सची विक्री होताना दिसत आहे.

दहापैकी दहा शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. अदानी पॉवरचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले, तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 3.3 टक्क्यांनी घसरले. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 2.50 टक्‍क्‍यांनी घसरले, तर अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस 2.25 टक्‍क्‍यांनी घसरले.

अदानी समूहाच्या सर्व 10 सूचिबद्ध कंपन्यांमधील घसरणीमुळे समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये 35,624 कोटी रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी व्यवहार संपेपर्यंत समूहाचे मार्केट कॅप 10,84,668.73 कोटी रुपये होते, जे आता 10,49,044.72 कोटी रुपयांवर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT