Adani group stocks boost investor wealth by Rs 1.9 lakh crore  Sakal
Share Market

Adani Group: शेअर बाजाराच्या तेजीत अदानी समूहाचा मोठा वाटा, गुंतवणूकदारांनी कमावले 1.9 लाख कोटी

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये काल जोरदार वाढ पाहायला मिळाली.

राहुल शेळके

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये काल जोरदार वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी शेअर बाजाराच्या वाढत्या मार्केट कॅपमध्ये अदानी समूहाच्या 10 कंपन्यांनी 65% पेक्षा जास्त योगदान दिले. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भांडवलात मंगळवारी 2.9 लाख कोटींची वाढ झाली, तर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी 1.9 लाख कोटींहून अधिक कमाई केली. अदानी समूहाच्या मार्केट कॅपमधील ही एक दिवसातील सर्वात मोठी वाढ आहे.

अमेरिकन संस्थेच्या क्लीन चिटमुळे अदानी समूहात जोरदार वाढ

अमेरिकन संस्था यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प (डीएफसी) च्या अहवालामुळे अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. संस्थेचे म्हणणे आहे की हिंडनबर्ग रिसर्चने केलेले शेअर्सच्या किंमतीतील फेरफार आणि फसवणूकीचे आरोप खोटे आहेत त्यात तथ्य नाही.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अलीकडेच अदानी समूहाने श्रीलंकेत बंदर बांधण्यासाठी DFC कडून 553 दशलक्ष डॉलर कर्जाची मागणी केली होती. कर्ज देण्यापूर्वी संस्थेने आपल्या स्तरावर अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशी केली होती. डीएफसी ही यूएस सरकारची वित्तीय संस्था आहे जी विकसनशील देशांच्या उदयोन्मुख बाजारपेठ आणि खाजगी क्षेत्रांना कर्ज देते.

हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स आणि समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या नेटवर्थचे मोठे नुकसान झाले होते. 2023 च्या सुरुवातीला गौतम अदानी यांची संपत्ती 150 अब्ज डॉलर होती, परंतु हिंडनबर्ग प्रकरणानंतर गौतम अदानी आणि समूहाची एकूण संपत्ती निम्म्याहून कमी झाली.

मात्र, आता अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सतत होत असलेल्या वाढीमुळे गौतम अदानी यांची संपत्ती पुन्हा 70 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये 4.41 अब्ज डॉलर्सची भर घातली.

गौतम अदानी आता जगातील 16 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत तर काही दिवसांपूर्वी ते अब्जाधीशांच्या यादीत 22 व्या स्थानावर होते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT