Share Market Tips Sakal
Share Market

Share Market Tips : ग्लास कंटेनर बनवणाऱ्या 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल

Best Multibaggeri Stock: सध्या हे शेअर्स एनएसईवर 346.55 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Investment Tips : शेअर बाजारात मल्टीबॅगर शेअर्समध्ये गुंतवणूक करून, तुम्ही कमी काळात दमदार नफा मिळवू शकता. तुम्हीही मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल, तर तुम्ही एजीआय ग्रीनपॅकच्या (Agi Greenpac) शेअर्सचा विचार करु शकता.

ही कंपनी देशातील आघाडीच्या ग्लास कंटेनर बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. त्यांनी 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. सध्या हे शेअर्स एनएसईवर 346.55 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

एजीआय ग्रीनपॅकच्या शेअर्सने लाँग टर्ममध्ये आपल्या गुंतवणुकदारांना चांगला नफा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत त्याच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्यांनी 15 टक्के परतावा दिला आहे.

गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी गुंतवणूकदारांना 238% इतका चांगला परतावा दिला आहे. 20 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले. या दरम्यान, कंपनीने 17,055.94 टक्के इतका जबरदस्त नफा दिला आहे.

कंपनीने 1981 मध्ये 'द असोसिएटेड ग्लास इंडस्ट्रीज लिमिटेडच्या' (AGI) अधिग्रहणासह कंटेनर ग्लास बिझनेसमध्ये प्रवेश केला. ही भारतातील आघाडीच्या काचेच्या कंटेनर उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे.

कंपनीकडे डाउनस्ट्रीम क्षेत्रात डायव्हर्स फ्यूएल ऑप्शन आणि प्रॉडक्ट ऍप्लिकेशन वापरण्याची क्षमता आहे. 2011 मध्ये गार्डन पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (GPPL) अधिग्रहणासह, एजीआय ग्रीनपॅकने पीईटी बाटल्यांच्या निर्मितीमध्ये विस्तार केला. कंपनीची स्थापना 1960 मध्ये झाली आणि तिचे हेडक्वार्टर गुरुग्राममध्ये आहे.

मार्च 2003 मध्ये, त्याच्या एका शेअरची किंमत 1.32 रुपये होती, जी आज 346.55 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कालावधीत कंपनीने सुमारे 17000 टक्के परतावा दिला आहे.

म्हणजेच गुंतवणूकदारांच्या पैशात 262 पट वाढ झाली आहे. जर तुम्ही मार्च 2003 मध्ये यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तेच 2 कोटी 62 लाख झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT