Anil Ambani’s Reliance Power doubled its money in 6 months 17 times return given in 3 years  Sakal
Share Market

Anil Ambani: अनिल अंबानींच्या कंपनीने 6 महिन्यात पैसे केले दुप्पट, 3 वर्षात दिला 17 पट परतावा

Anil Ambani: गेल्या 6 महिन्यांत अनिल अंबानींच्या कंपनीची जोरदार वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Anil Ambani: अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांनी दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ते व्यवसाय चालू ठेवण्यासाठी धडपडत आहेत, काही कंपन्या तर दिवाळखोरीत निघाल्या आहेत.

दरम्यान, गेल्या 6 महिन्यांत अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची किंमत 6 महिन्यांत दुप्पट झाली आहे. ज्यामुळे कंपनीचे मूल्यांकन दुप्पट झाले आहे.

तीन वर्षांपूर्वी कंपनीचे शेअर्स फक्त 1 रुपयांवर ट्रेडिंग करत होते तेव्हा कंपनीने सार्वकालिक नीचांक गाठला होता, परंतु आता स्थिर रिकव्हरीमुळे मागील वर्षातील सर्वकालीन उच्चांक 20 रुपयांपेक्षा जास्त होता. 30 सप्टेंबर रोजी अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत 20.12 रुपये होती, तर 22 ऑक्टोबरला बाजार उघडण्यापूर्वी शेअर्सची किंमत 18.50 रुपये होती.

रिलायन्स पॉवर आणि इन्फ्रामध्ये 1,043 कोटी रुपयांची गुंतवणूक

अनिल अंबानी समूहाच्या दोन सूचीबद्ध कंपन्यांनी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने 1,043 कोटी रुपये उभारले आहेत. रिलायन्स कमर्शिअल फायनान्समधून हा पैसा उभा करण्यात आला आहे. शेअर्सच्या माध्यमातून हा पैसा उभा करण्यात आला आहे.

रिलायन्स कमर्शियल फायनान्स पूर्वी अनिल अंबानी समूहाची कंपनी होती. ऑटम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनी विकत घेतली होती. रिलायन्स कमर्शियल फायनान्स रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 891 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

रिलायन्स पॉवरमध्ये 152 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. या व्यवहारानंतर, रिलायन्स कमर्शियलकडे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 11 टक्के आणि रिलायन्स पॉवरमध्ये 2 टक्के हिस्सा असेल. कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी अनिल अंबानी रिलायन्स टेलिकम्युनिकेशन्स आणि आरइन्फ्रासह त्यांच्या काही कंपन्या विकण्याच्या प्रक्रियेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT