IPO News Update  sakal
Share Market

IPO News Update : तुमचं वय 30 वर्ष आहे का? ; मग हा एसआयपी प्लॅन तुमच्यासाठी उत्तम...

पैसे गुंतवले की वाढतात हा साधा नियम सगळ्यांनाच माहित आहे. पण ही गुंतवणूक जितक्या लवकर सुरू केली जाईल तितके चांगले. आज आम्ही 30 व्या वर्षापासून एसआयपी सुरु केल्यास किती फंड जमा होऊ शकतो त्याबद्दल सांगणार आहोत.

सकाळ वृत्तसेवा

पैसे गुंतवले की वाढतात हा साधा नियम सगळ्यांनाच माहित आहे. पण ही गुंतवणूक जितक्या लवकर सुरू केली जाईल तितके चांगले. आज आम्ही 30 व्या वर्षापासून एसआयपी सुरु केल्यास किती फंड जमा होऊ शकतो त्याबद्दल सांगणार आहोत. इक्विटी म्युच्युअल फंडात दरमहिन्याला 3000 गुंतवायचे तेही सलग 30 वर्षांसाठी. यामुळे तुमच्याकडे तब्बल 4.17 कोटी रुपये जमा होतील. तुम्हाला खोटं वाटत असेल पण हे खरं आहे.

तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 30 व्या वर्षी 3000 रुपयांची पहिली गुंतवणूक केली आणि पुढे 30 वर्ष नियमित गुंतवणूक केली तर एक मोठा फंड तयार होईल. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करणे फायदेशीर आहे.

तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये 30 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्हाला अंदाजे 15% परतावा मिळाला तर तुमचा कोट्यधीश होण्याचा मार्ग सोपा होईल. सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ. म्हणजे, तुम्हाला 30 वर्षांत 15% सह चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल. समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात. दररोज 100 रुपये वाचवले आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक केली. दरवर्षी 10% स्टेप-अप करत रहा. जर तुम्ही 3000 रुपयांपासून सुरुवात केली असेल तर तुम्हाला ही रक्कम पुढील वर्षी 300 रुपयांनी वाढवावी लागेल.

30 वर्षांनंतर तुमची मॅच्युरिटी रक्कम 4,50,66,809 रुपये असेल. एसआयपी कॅलक्युलेटरनुसार, 30 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक 59 लाख 21 हजार 785 रुपये असेल. पण इथे केवळ परताव्यातून मिळणारा नफा 3 कोटी 91 लाख 45 हजार 025 रुपये असेल. एसआयपीमधील परताव्याची ही जादू आहे. म्हणजेच फॉर्म्युला स्टेप-अपच्या मदतीने, तुमच्याकडे 4 कोटी 50 लाख रुपयांचा मोठा फंड असेल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

Ferry Boat: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू, प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील नियुक्त्या अवैध; पगार वसुलीचे निर्देश, फाइल, आदेश नसलेल्या शिक्षकांवर कारवाई

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! १० हजार स्वयंसेवक आणि होमगार्ड्स सांभाळणार भाविकांच्या सुरक्षेची धुरा

SCROLL FOR NEXT