Ashapura Logistics Limited IPO Open Know Details share market sebi investment  Sakal
Share Market

Ashapura Logistics IPO : आशापुरा लॉजिस्टिक लिमिटेडचा आयपीओ खुला, जाणून घ्या डिटेल्स...

IPO investment news in marathi | आशापुरा लॉजिस्टिक लिमिटेडचा (Ashapura Logistics IPO) आयपीओ आज अर्थात 30 जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

आशापुरा लॉजिस्टिक लिमिटेडचा (Ashapura Logistics IPO) आयपीओ आज अर्थात 30 जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ 1 ऑगस्टला बंद होईल. आयपीओसाठी शेअर ऍलॉटमेंट 2 ऑगस्टला निश्चित केले जाईल. 5 ऑगस्ट रोजी डीमॅट खात्यात शेअर क्रेडिट किंवा रिफंड शक्य आहे.

कंपनीने 6 ऑगस्टला एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर आपले शेअर्स लिस्ट करणे अपेक्षित आहे. हा आयपीओ 52.66 कोटीचा बुक बिल्ट इश्यू आहे. हा 36.57 लाख शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे. सुजित चंद्रशेखर कुरूप आणि चित्रा सुजित कुरूप हे कंपनीचे प्रमोटर आहेत.

आशापुरा लॉजिस्टिक आयपीओसाठी प्राइस बँड 136-144 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. एका ऍप्लिकेशनसह किमान लॉट साईज 1000 शेअर्सची आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक रक्कम 1 लाख 44 हजार आहे.

सार्वजनिक ऑफरपैकी सुमारे 50% पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs), 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15% गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) राखीव आहेत. बीलाइन कॅपिटल ऍडव्हायझर्स प्रायवेट लिमिटेड हे आशापुरा लॉजिस्टिक आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

लॉजिस्टिक कंपनी आशापुरा लॉजिस्टिक लिमिटेड कार्गो हँडलिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंग, ट्रान्सपोर्टेशन, गोदाम आणि वेअरहाऊसिंग आणि डिस्ट्रीब्यूशन शिवाय कोस्टल मुव्हमेंटमध्ये दिग्गज मानली जाते. कंपनी सर्वसमावेशक सेवा ऑफर, तंत्रज्ञानासह सेवा आणि वाहनांच्या मजबूत नेटवर्कद्वारे अद्वितीय लॉजिस्टिक सोल्यूशन्स प्रदान करते.

फ्रेट फॉरवर्डिंग टीम अहमदाबादमध्ये स्थित आहे, ज्याच्या शाखा हाजीरा, मुंद्रा, पिपावाव, कांडला, जेएनपीटी आणि इतर आयसीडीसारख्या समुद्री बंदरांवर आहेत. ते ग्राहकांना फ्रेट फ़ॉरवर्डिंग आणि सीएचए सेवा प्रदान करतात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT